file photo 
नांदेड

नांदेड : सात फेऱ्या घेण्याअगोदर गळ्यात पडली सरपंच पदाची माळ; आरळी येथील उच्चशिक्षित सरपंच तरुणीचा सोमवारी लग्न सोहळा

विठ्ठल चंदनकर

बिलोली  (जिल्हा नांदेड) :  बिलोली तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आरळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सूत्रे उच्चशिक्षित राजेश्री प्रकाश लाकडे यांच्याकडे देण्यात आली. विशेष म्हणजे येत्या सोमवारी (ता. १५) ती विवाह बंधनात अडकणार आहे. लग्नापूर्वीच सरपंच पदाचीमाळ गळ्यात पडलेल्या राजश्रीला मात्र यापुढे दुहेरी भूमिका बजावावी लागणार आहे.

बिलोली तालुक्यातील आरळी ग्रामपंचायतीची निवडणुक यंदा अतिशय चुरशीची झाली. येथील काँग्रेस पक्षाचे अनुभवी व ज्येष्ठ राजकारणी हाजप्पा पाटील सुंकलोड यांच्या पॅनलचा दारुण पराभव करुन पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ताराम पाटील बोधने व शिवा संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते सदाशिव पाटील बोडके यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला.

लाॅकडाऊनच्या काळात बोडके परिवारातील जगदीश गंगाधर बोडके व जयश्री प्रकाशराव लाकडे या दोघांच्या रेशीमगाठी जुळल्या. त्याचा पुरेपूर फायदा घेत लाकडे, बोधने व बोडके या परिवारांनी एकत्र येऊन पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेल्या राजश्री हिस नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंच पदाचे दावेदार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले. निवडणुकीमध्ये तिचा दणदणीत विजयी झाला. जगदीश बोडके व राजश्री लाकडे यांचा येत्या सोमवारी विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

तत्पूर्वीच मंगळवारी (ता. नऊ) आरळी येथील सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी जाहीर झाल्या. त्यात राजश्री प्रकाशराव लाकडे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली. उपसरपंच पदाची धुरा संजय शंकरराव नरहरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती दतराम पाटील बोधने व युवा कार्यकर्ते सदाशिव पाटील बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली लाकडे परिवारातील राजश्री लाकडे यांना बोडके परिवाराची सून म्हणून तसेच गावातील सरपंच म्हणून आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण करावी लागणार आहे. या निवडीबद्दल शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT