file photo 
नांदेड

नांदेड : ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचे निधन 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक, मराठवाडा साहित्य परिषदेचे अर्ध्वयु प्रा. तु. शं. कुळकर्णी (व ८९) यांचे शनिवारी (ता. दहा) दुपारी एकच्या सुमारास नांदेड येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

तृणाची वेदना, ग्रीष्मरेखा, अखेरच्या वळणावर हे कुळकर्णी यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तर स्वातंत्र्योत्तर मराठी कविता या ग्रंथाचे त्यांनी साहित्य अकादमीसाठी संपादन केले आहे. मसापच्या प्रतिष्ठान मासिकाचे संपादक पद त्यांनी पंधरा वर्षे भूषविले होते. हे मसापच्या कार्यवाह पदाची जबाबदारी पंधरा वर्षे सांभाळली. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावरही त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. २०१६ साली मसापने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. 

औरंगाबाद येथे झालेल्या तेविसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार समिती सदस्य, नवलेखकांना अनुदान देणाऱ्या साहित्य संस्कृती मंडळाचे तज्ञ परीक्षक, राज्य नाट्यप्रयोग परीक्षक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. १९४८ आली मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर एरवी स्थितीतील असणाऱ्या या काळच्या या प्रदेशातील जीवनावर जे तरंग उमटले त्याचे चित्रण करणाऱ्या काही मोजक्याच लेखकांमध्ये प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचे स्थान महत्त्वाचे होते. ते येथील जेष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी यांचे वडिल होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी

Rajat Patidar: रजत पाटीदारचा धमाका! ख्रिस गेलचा ९ वर्षांचा महाविक्रम धुळीला

काहींना ते झोंबलं कारण ... प्राजक्ता माळीच्या 'कान्स' मधील लूकवर सई ताम्हणकर नेमकं काय म्हणाली? तुम्ही गेलात काय आणि नाही गेलात काय...

Adhik Maas Do's & Don'ts: अधिक मास 2026 सुरू; भगवान विष्णूंची कृपा हवी असेल तर या महिन्यात ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका

माय तशी लेक ! कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याची आराध्यासोबत हजेरी; ग्लॅमरस लूकने जिंकलं मन

SCROLL FOR NEXT