nanded sakal
नांदेड

Nanded News : नांदेडला पर्यटनाच्या क्षेत्राचा शिर्डीच्या धर्तीवर व्हावा विकास ; उपमुख्यमंत्री पवार

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रमाणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक झाली.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड जिल्ह्यात पर्यटनाच्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. येथील शिख धर्मीयाचे श्रध्दास्थान असलेले हुजूर साहिब सचखंड गुरुद्वारा, साडेतीन शक्ती पिठापैकी एक असलेले माहूर येथील रेणुका देवी मंदिर व दत्ताचे जागृत स्थान, विस्तीर्ण गोदावरी, महानगरानजीक असलेला विष्णुपूरी प्रकल्पाचा जलाशय आदी ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. राज्यातील शिर्डीच्या धर्तीवर नांदेड येथे विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असून विमानसेवा सुरु करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता.दहा) केले.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रमाणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीस नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, नियोजन विभागाचे उपआयुक्त किरण गिरगावकर यांनी दूरदृष्यप्रमाणालीद्वारे तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व इतर विभागाचे अधिकारी यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

दोनशे कोटींची अतिरिक्त मागणी

जिल्हाधिकारी राऊत यांनी नांदेड जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा सचित्र आढावा सादर केला. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२४-२५ च्‍या ४२६ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखडा राज्यस्तरीय समितीस मान्यतेसाठी सादर केला. नांदेड जिल्ह्याची असलेली व्याप्ती, सोळा तालुके, दोन राज्याच्या असलेल्या सीमा लक्षात घेता विविध विभागाने विकास कामासाठी निधीची मागणी केली आहे. या विकास कामासाठी दोनशे कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक विचार करु असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Export Tax: मोठी बातमी! डिझेल आणि हवाई इंधन निर्यातीवर करात दुप्पट वाढ; केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक, जाणून घ्या नवे दर...

Sanju Samson : सर, तुम्ही माझ्यासाठी लकी आहात, प्लीज प्रत्येक मॅचला या...! विक्रमी शतकानंतर संजूने कोणाला केली विनंती? भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव...

IAS Sandeep Rathod News: तुळशीचे भूमिपुत्र आयएएस संदीप राठोड केंद्र सरकारच्या संयुक्त सचिवपदी नियुक्त; माहूर तालुक्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Chh. Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावर स्विफ्ट कारची ट्रॅक्टरला भीषण धडक; महिलेचा हात फ्रॅक्चर, एक जखमी

Narendra Modi Ambulance Video : बंगालमध्ये रोड शोदरम्यान पंतप्रधान मोदींनी थांबवला ताफा; रुग्णवाहिकेला दिला मार्ग, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT