Nanded  sakal
नांदेड

Nanded : बरबड्यात काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात

दर्जासह उत्पन्नही घाटणार : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत

चंद्रकांत सूर्यतळ

बरबडा : यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरूवातीपासून शेतकऱ्यांवर विविध संकटाचा सामना होत असून अद्याप संकटाने पाठ सोडली नाही. सुरूवातीला गोगलगाय त्यानंतर मोझॅक व तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झाला होता. एवढ्या प्रादुर्भावावर कीटकनाशकाची फवारणी करून पीक जोपासले आहे. मात्र, हातातोंडाशी आलेले सोयाबीन ऐन काढणीच्या वेळेत पावसाच्या फेऱ्यात सापडले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून आर्थिक अडचणीत आला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच असमतोलतेमुळे शेतकरी दर वर्षी कोणत्या ना कोणत्या कारनाने संकटात सापडत आहे. सुरूवातीला पेरणीच्या वेळी पावसाने ओढ दिल्याने उशीरा पेरणी झाली. त्यानंतर सततच्या ढगाळ वातावरणामुळे गोगलगाय, मोझॅको, तांबेरा यासह विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी पदरमोड तर काही शेतकऱ्यांनी सावकाराकडून पैसे घेऊन दरवर्षीपेक्षा दुप्पट फवारणी करून पीक जोपासली.

हातातोंडाला आलेले पीक सध्या काढणीला आले आहे. मात्र, ऐन काढणीच्या वेळेस पावसाने सुरूवात केली असून काही शेतकऱ्यांचे काढलेले तर काहींचे शेतातील सोयाबीन भिजत आहे. याचा फटका सोयाबीनच्या गुणवत्तेवर होणार असून खराब सोयाबीनला अत्यंत कमी दर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सततच्या पावसाने किती सोयाबीन शेतकऱ्यांच्या हाती लागते हे काही सांगता येत नाही.

या परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. तालुक्यात जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरिपाची पेरणी जुलै महिन्यात करण्यात आली. शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी महागा मोलाची बियाणे, खते विकत घेऊन पेरण्या केल्या. पेरण्या झाल्यावर पावसाने साथ दिली नाही. यामुळे उडीद, सोयाबीन पिकांवर मोठ्या प्रमाणात मोझॅक, गोगलगाई, विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकऱ्यांनी महागडी औषधे वापरून पिकांना जीवदान दिले. खरीप पिकांपासून चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न शेतकरी रंगवत होता. मात्र, ऐन खरिपाची पिके काढणीच्या वेळी पावसाने धुमाकुळ घातला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Note Update: RBI कडून 2 अब्ज प्लॅस्टिकच्या नोटा लवकरच चलनात! केंद्रीय मंत्र्यांची संसदेत माहिती; कागदी नोटा बंद होणार?

सलग ५ निर्धाव षटकं अन् ५ विकेट्स; Justin Greaves इतिहास घडवला, पाकिस्तानने गुडघे टेकले; ७ फलंदाज ३८ धावांत तंबूत Video

Latest Live Updates Marathi : : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंची बस रस्त्यावरून थेट घरावर कोसळली; ३९ जण जखमी

Commonwealth Games: कारगिल योद्ध्यांना विजय समर्पित... पाकिस्तानी बॉक्सरचा धुव्वा उडविल्यानंतर भारताच्या जादुमानीची भावना

Shalarth ID Scam : 841 बोगस शिक्षक अन् 160 कोटींची फसवणूक! शालार्थ घोटाळ्यात मोठा मासा गळाला; भाजप नेत्याच्या अटकेने खळबळ, संस्थाचालकाच्या फलटणमधून आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT