file photo 
नांदेड

नांदेड : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एसपी कोरोना बाधित, संपर्कातील सर्वांनी तपासणी करावी, आवाहन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना संसर्गाला जवळ न येऊ देता कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा केला. मात्र अखेर दुसऱ्या लाटेत खुद्द राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे यांना कोरोनाने घेरले आणि ते कोरोना बाधीत झाले. ते सध्या वैद्यकीय सल्ल्यानुसार होम क्वारंटाईन आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीवर डाॅक्टर लक्ष ठेवून आहेत. 

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रत्येकाने काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये व या संसर्गाची साखळी तुटावी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सल्ल्यानुसार ता. 25 मार्च पासून ता.चार एप्रिलपर्यंत जिल्हाभरात लाॅकडाऊन जाहीर केले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. नांदेडकरांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाची साखळी तोडावी असे आवाहन त्यांनी केले आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांना नुकतीच कोरोनाची बाधा झाली आहे. ते आपल्या पथकासह जिल्हाभरात विविध ठिकाणी अवैध देशी दारु, हातभट्टी विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम राबवित असतात. यातच त्यांना दोन दिवसापासून प्रकृतीत बिघाड दिसून आल्याने त्यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी केली. या चाचणीत ते कोरोना पॉझिटिव आढळले. या नंतर कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी याच कार्यालयातील दुय्यम निरीक्षक भगवान मंडलवार यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनी यावर मात करत आपल्या सेवेला सुरुवात केली आहे. त्याप्रकारे निलेश सांगडे हेही या संकटावर मात करुन आपल्या सेवेत रुजू होतील असा विश्वास सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

संपर्कात आलेल्यांनी तपासणी करावी- सांगडे


कोरोना बाधीत झालेल्या श्री. सांगडे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना आवाहन केले आहे की, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना तपासणी करुन घ्यावी. कुठलाही ताप किंवा खोकला अंगावर काढू नका, आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असे आवाहन त्यांनी केले आहे. 
- निलेश सांगडे, जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT