file Photo 
नांदेड

नांदेड - श्रीराम मंदिर निधीसाठी विशेष अभियान 

शिवचरण वावळे

नांदेड - श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारणीचे आंदोलन अंतिम टप्प्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आणि त्यानंतर झालेल्या भूमिपूजन समारंभानंतर आता मंदिर निर्माण कार्याला सुरवात झाली आहे. या मंदिराच्या निर्माणाच्या कार्यात अधिकधिक राम भक्ताचे योगदान झाले पाहिजे. यासाठी मकर संक्रांती पासून एक महिन्याचे विशेष अभियान घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान समिती यांनी दिली. 

डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थिती सन्मान प्रेस्टीज येथे शुक्रवारी (ता. एक) पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. या वेळी पुढे बोलताना शिवाचार्य महाराज म्हणाले की, जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबापर्यंत संपर्क साधून त्यांच्याकडून खारीचा वाटा जमा करण्यात येणार आहे. भव्य मंदिराची उभारणी करताना देशातील गावोगावच्या अधिकाधिक नागरिकांचे योगदान व्हावे आणि त्यांच्या भावना जोडल्या जाव्यात. या हेतूने येत्या मकर संक्रांतीपासून महिनाभरात घरोघरी जाऊन फक्त कार्यकर्ते निधी समर्पण जमा करणार आहेत. 

हजारो कार्यकर्ते सहभागी होणार 

जमेल तेवढा निधी प्रत्येक कुटुंबाला समर्पित करता यावा यासाठी दहा, शंभर व हजार रुपयाचे कुपण करण्यात आले. जिल्हा व तालुका स्तरावर कार्यकर्त्याच्या बैठका पार पडल्या आहेत. जिल्हातील साधारणपणे एक हजार गावापर्यंत सुमारे अडीच लाख कुटुंबापर्यंत संपर्क करण्यात येणार आहे. यात हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. 

मंदिर निर्माण कार्यात खारीचा वाटा नोंदवावा 

हे अभियान संपूर्ण देशभरातील चार लाख गावात व ११ कोटी कुटुंबापर्यंत संपर्क होणार असून, जिल्ह्यातील सर्व ज्ञाती संप्रदायाच्या जाती पंथाच्या सर्व राम भक्तांनी भव्य राम मंदिर निर्माण अभियानात सहभाग नोंदवून आपण मंदिर निर्माण कार्यात खारीचा वाटा नोंदवावा 
अशी विनंती अध्यक्ष डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

दीप-ज्योतीची वाढती जवळीक तर तारिणीच्या जीवाला धोका; ‘झी मराठी’वरील मालिकांमध्ये या आठवड्यात काय घडणार?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

निवेदिता सराफ करतात ते इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? किती ते किती वाजेपर्यंत करतात? म्हणाल्या, 'मी कायम...'

SCROLL FOR NEXT