file photo 
नांदेड

नांदेड : 379 ग्रामीण आरोग्य उपकेंद्रांमार्फत जिल्हाभरात लसीकरणासाठी विशेष मोहिम- जिल्हाधिकारी डॉ. विपीन 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या बीपी, शुगर व इतर गंभीर आजारांच्या व्यक्तींसाठी आज जिल्ह्यातील 379 ग्रामीण आरोग्य उपकेंद्रांवर कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. ग्रामीण भागात कोरोनाच्या प्रादुर्भावापासून अशा व्यक्तींची सुरक्षा व्हावी यासाठी ही विशेष मोहिम आपल्या नांदेड जिल्ह्यात सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 379 आरोग्य उपकेंद्र असून यात 49 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या 49 प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्वीपासूनच लसीकरण सुरु केले असून आता नव्याने 330 उपकेंद्रांची लसीकरणासाठी भर पडली आहे. सर्वच तालुक्यातील आज निवड उपकेंद्रापासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत 6 हजार 500 पेक्षा अधिक व्यक्तींनी आज लस घेतली. 

व्यापक प्रमाणात नांदेड जिल्ह्यात ही मोहिम प्राथमिक स्तरावर सुरु करण्यात आली

सोमवार (ता. २९) पासून टप्प्याटप्याने सर्व केंद्र पूर्ण कार्यक्षमतेने सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. याच केंद्रांवर 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनाही लसीकरणाच्या टप्प्यात घेतले जाणार आहे. ग्रामीण आरोग्य विभागातर्फे एवढ्या व्यापक प्रमाणात नांदेड जिल्ह्यात ही मोहिम प्राथमिक स्तरावर सुरु करण्यात आली आहे. यासाठी लागणारे वैद्यकिय पथक ग्रामीण आरोग्य विभागाने तयार ठेवले असून जिल्हा प्रशासनामार्फत त्याचे संयोजन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT