अशोक चव्हाण  sakal
नांदेड

नांदेड : विशेष पथकाद्वारे बियाणी हत्येचा तपास

अशोक चव्हाण यांची माहिती, मराठवाड्यात ठिकठिकाणी घटनेचा निषेध

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : बांधकाम व्यावसायिक, उद्योजक संजय बियाणी यांची निर्घृण हत्या मनाला वेदना देणारी आहे. हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईसह घटनेमागे कोणी सूत्रधार असेल तर त्या दृष्टीने पोलिस यंत्रणा तपास करील. या घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली असून विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. निष्पक्षपातीपणे तपास केला जाईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, मराठवाड्यात ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला.

चव्हाण यांनी बुधवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, निसार तांबोळी, प्रमोदकुमार शेवाळे उपस्थित होते. मुंबईत गुरुवारी (ता. ७) गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. योग्य दिशेने तपास करण्याबाबतच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत. संजय बियाणी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. त्यांचे म्हणणे तपास अधिकारी लक्षात घेतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. हत्येमागचे कारण काय, हा मोठा प्रश्न असून, त्याचे सूत्रधार कोण यासह सामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु नागरिकांनी न घाबरता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

न घाबरता पुढे या

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना राहावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सध्याच्या विद्यमान परिस्थितीवर चर्चा झाली. हत्या, धमकीसारख्या घटनांतून संशयितांकडून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना धमक्या येत असतील, तर त्यांनी न घाबरता पुढे येऊन पोलिसांना माहिती दिली पाहिजे. नाव गोपनीय ठेवले जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

दरम्यान, संजय बियाणी यांच्या पार्थिवावर शहरातील गोवर्धन घाट येथे आज दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नांदेडसह मराठवाडा, राज्यातील अन्य काही शहरांत मूक मोर्चे काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर संजय बियाणी यांच्या पत्नीने या घटनेचा निषेध करत संशयितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT