Seeds sakal
नांदेड

Nanded : केवळ हलक्या पावसाचा शिडकावा, पेरणीसाठी कर्ज काढून विकत आणलेली बियाणे हे घरात पडून

कर्ज काढून बियाणे खरेदी करावी लागली. देशाचा कणा म्हणून बळीराजाची ओळख आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ, तर दुसरीकडे पिकलं तर बाजारात भाव नाही अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी भरडला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nanded - जून महिना संपत आला तरी पावसाने हजेरी लावलेली नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून गेल्या तीन दिवसापासून मारतळा परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र सोमवारी (ता.२६) रोजी सकाळी व दुपारी केवळ हलक्या पावसाचा शिडकावा झाल्याने चाड्यावर मूठ ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अजून तरी प्रतीक्षा आहे.

यंदा उन्हाळ्यातही अवकाळी पावसाने झोपून काढत रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी सावरत, पेरणीपूर्व मशागतीची कामे संपवून बी - बियाणे व रासायनिक खतांची खरेदी ही अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चाची जुळवाजुळव करताना त्यांच्या नाकी नऊ आली.

कर्ज काढून बियाणे खरेदी करावी लागली. देशाचा कणा म्हणून बळीराजाची ओळख आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ, तर दुसरीकडे पिकलं तर बाजारात भाव नाही.अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी भरडला जात आहे. यंदा जून महिना संपत आला, मात्र अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळबल्या आहेत. पेरणीसाठी कर्ज काढून विकत आणलेली बियाणे हे घरात पडून आहेत.

मागील तीन दिवसापासून मारतळा परिसरात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.

मात्र सोमवारी (ता.२६) रोजी सकाळी व दुपारी काळे कुट्ट ढग दाटून येऊन ही परिसरात हलक्या पावसाचा शिडकावा झाल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले असून पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लांबलेल्या पावसामुळे पाणी व चारा टंचाई

जुन महिना संपत आला, मात्र पाउस लांबल्यामुळे भुगर्भातील पाणी पातळी खोल गेल्यामुळे अनेक बोअरवेल बंद पडले आहेत. परिणामी अनेक गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर लांबलेल्या पावसामुळे चारा टंचाई निर्माण झाली असून पशुपालक अडचणीत सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT