nanded ST bus raise ticket prices Passengers prefer private buses sakal
नांदेड

नांदेड : प्रासंगिक कराराकडे भाडेवाढीमुळे पाठ

उत्पन्नाचा स्त्रोत आटला : नागरिकांची खासगी बसला पसंती

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पूर्वी लग्न किंवा महत्वाचा सोहळा म्हटले की वऱ्हाडी मंडळीसाठी सुरक्षित वाहन म्हणून लालपरीच पहिली पसंती असायची. मात्र, आता ती जागा खासगी बसने घेतली आहे. याला कारण आहे एसटीने केलेली भाडेवाढ. एसटीपेक्षा भाडेही कमी आणि वातानुकुलीत लांबचा प्रवास असल्यास झोपून जाण्याची सोय उपलब्ध असल्याने पहिली पसंती खासगी वाहनांना मिळत आहे. परिमाणी, नागरिकांनी एसटी महामंडळाच्या प्रासंगिक कराराकडे पाठ फिरवल्याने हमखास उत्पन्नाचा स्त्रोतही आटला आहे.

विश्वसनीयता आणि सुरक्षितता म्हणून लग्न कार्यात वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाण्यासाठी लोकांची पहिली पसंती एसटीच्या बसला होती. त्यामुळे लग्नाच्या सिझनला शहरासह ग्रामीण भागातसुद्धा लग्नात पाहुणे मंडळी एसटी बसने उतरत होते. हे चित्र गेल्या काही वर्षांपर्यंत चांगले होते. त्यामुळे एसटी बसला या प्रासंगिक करारातल्या लग्नाच्या बुकींगमधून चांगले उत्पन्न मिळत होते. एप्रिल ते जून या तीन महिन्यातील लग्नाच्या सिझनमध्ये दरदिवशी एका आगारातून सात ते दहा बस लग्नाच्या बुकींगवर जायच्या. आता मात्र गेल्या दोन चार वर्षात हे प्रमाण नगण्य झाले आहे. आता केवळ दोन ते तीन बस जात असल्याचे वास्तव आहे.

चार वर्षांपूर्वी लालपरीचे भाडे ३० ते ३५ रुपये प्रत्येक किलोमीटर असायचे. आता त्यात वाढ होऊन ६३ रुपये किलोमीटर झाले आहे. त्यातल्या त्यात १८ टक्के जीएसटी आणि १० टक्के सुरक्षा अनामत रक्कम ठेवावी लागते. त्या तुलनेत खासगी बस मात्र थेट ठेका पद्धतीने लग्नाची बुकिंग घेऊन मोकळे होतात. त्यांचे भाडे कमी आणि उकाड्यात वातानुकूलित गाडीसह आधुनिक सुविधा प्रवाशांना मिळते. एकंदरीतच भाडेवाढीमुळे एसटीची लग्नाची बुकिंग निम्म्यापेक्षाही कमी झाली असून त्याचा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसत आहे.

दरात झालेली वाढ

  • पाच वर्षापूर्वीचे भाडे ३० ते ३५ रुपये प्रति किलोमीटर

  • सध्याचे भाडे ६३ रुपये किलोमीटर

  • शिवशाहीचे ६५ रुपये किलोमीटर

  • लालपरीसाठी १८ टक्के जीएसटी

  • दहा टक्के सुरक्षा अनामत रक्कम

  • शिवशाहीला पाच टक्के जीएसटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT