Nanded News 
नांदेड

नांदेड -‘शक्ती’ कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची हमी द्यावी 

शिवचरण वावळे

नांदेड -‘दिशा’ कायद्याच्या धर्तिवर महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायद्याची निर्मिती केली आहे. या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची सरकराने हमी द्यावी अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी केली आहे. 

बिलोली येथील मुकबधीर मुलीवर अत्याचार करुन दगडाने ठेचून मारण्यात आले आहे. त्यानिमित्ताने भाजपच्या उमा खापरे यांनी बुधवारी (ता. १६) बिलोली येथील पीडित कुटुंबियांना भेट देऊन सात्वन केले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, डॉ. अजित गोपछडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रणीती देवरे, डॉ. मिनल खतगावकर, चित्ररेखा गोरे, डॉ. शितल भालके (वैद्य) यांची उपस्थिती होती. 

तपास यंत्रणेवर प्रश्‍नचिन्ह 

पुढे बोलताना श्रीमती खापरे म्हणाल्या की, भाजप महिला आघाडी पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार आहे. बिलोली अत्याचार प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिस अधिकारी यांची भूमिका संशयास्पद असून, संबंधित पोलिसांची भेट घेतली असता त्यांच्याकडून मिळालेली माहिती ही संभ्रम निर्माण करणारी असल्याचे सांगुन त्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. 

भाजप महिला मोर्चा रस्त्यावर उतरणार

सरकारची पोलिसांवर वचक नसल्याने राज्यातील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून तीन ते ५० वर्षापर्यंच्या मुली - महिलांवर अत्याचार होत आहेत. कोविड सेंटरमध्ये देखील महिला सुरक्षित नसल्याचे श्रीमती खापरे म्हणाल्या. पुढील आठ दिवसात संबंधीत प्रकरणाचा योग्य तो तपास न लागल्यास भाजप महिला मोर्चा रस्त्यावर उतरुन सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचे श्रीमती खापरे म्हणाल्या. 

पीडित मुलीच्या कुटुंबियांना धमक्या 

दरम्यान बिलोली येथील पीडित कुटुंबियांची भेट घेऊन भाजपच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली असली, तरी शंकरनगर प्रकरणातील काही आरोपी अद्यापही मोकाट असून, अत्याचार पीडित मुलीच्या कुटुंबियांना धमक्या येत असल्याच्या पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्‍नाला मात्र भाजपच्या पदाधिकारी यांनी न बोलता बगल दिल्याचे दिसून आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT