Ashok Chavan 
नांदेड

Nanded : पावणे दोन कोटी निधीतून अद्ययावत अभ्यासिका साकारणार

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : स्पर्धेच्या युगात श्रीमंतांच्याच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी-सुविधा मिळत असतात. परंतु सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी उपेक्षित असतात. त्यामुळे अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी शहरातील शोभानगर, स्वातंत्र्य सैनिक कॉलनीत महापालिकेच्या शॉपिंग सेंटरवर डॉ. शंकरराव चव्हाण अद्ययावत अभ्यासिका एक कोटी ७६ लाखांच्या निधीतून साकारणार आहे. शुक्रवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे.

नांदेड वाघाळा महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला होता. अद्ययावत अभ्यासिकेसाठी यापूर्वी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीने ७६ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

या निधीतून १३० विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका कॉर्पोरेट सुविधांसारखी ११६ बाय ३६ फुट जागेत निर्माण होणार आहे. यात प्रामुख्याने विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्वतत्र प्रसाधनगृह, लॉकर्स, शु-रॅक्स, रिसेप्शन काउंटर, कॉन्फरन्स हॉल, स्टडी टेबल व इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत.

इतरही विकासाचे नारळ फुटणार

प्रभाग क्रमांक चारमध्ये दीड कोटीचे सिमेंट रस्ते करणे व लोकार्पण, नाईकनगर येथील मोकळ्या जागेत ४९.३७ लक्ष निधीतून बास्केटबॉल ग्राऊंड विकसित करणे, एक कोटी ३० लक्ष निधीतून सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन, आनंदनगर ते शोभानगर डेकोरेटीव्ह लाईट्स बसविण्याच्या एक कोटीच्या कामाचे भूमिपूजन, पौर्णिमानगरमध्ये दलितवस्तीच्या २५ लक्ष रुपये निधीतून नाली व रस्ता दुरुस्ती करणे, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी येथे असलेल्या मोकळ्या जागेत बॅटमिंटन कोर्ट एरिया व्हॉलीबॉल कोर्ट परिसरात वृक्षारोपण आदींचे भूमिपूजनासह लोकार्पणाचे नारळ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज फुटणार आहे.

डॉ. शंकरराव चव्हाण अद्ययावत अभ्यासिका निर्माण होत आहे, या अभ्यासिकेचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज होत आहे. खऱ्या अर्थाने ही अभ्यासिका विद्यार्थ्यांना गुरुकुल ठरून येथून अनेक विद्यार्थी निश्चितच घडतील.

- किशोर स्वामी, सभापती, स्थायी समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT