Nanded sub divisional agriculture officer posts due vacancies 
नांदेड

नांदेड : रिक्तपदांमुळे कृषी विभागात प्रभारी राज

कामाचा खोळंबा; जिल्ह्यात नऊ टिएओंसह तिन्ही उपविभागीय कृषी अधिकारीपद रिक्त

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात राज्य शासनाच्या कृषी विभागातील १६ पैकी तब्बल नऊ तालुका कृषी अधिकारी पदांसह प्रकल्प संचालक (आत्मा), तिन्ही उपविभागीय कृषी अधिकारी पदे रिक्त असल्याने या ठिकाणचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर आहे. या सोबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालकांसह जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील तब्बल ३०९ पदे रिक्त आहेत. शासनाने याची गांभीर्याने दखल घेवून रिक्तपदांचा अनुशेष दूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

मराठवाड्यातील सर्वाधिक आठ लाखापेक्षा अधिक पेरणीक्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्यात कृषी विभागाच्या रिक्त पदांमुळे कामाचा खोळंबा होत आहे. निम्यापेक्षा अधिक तालुक्यांचा कारभार प्रभारीवर असल्याने या कामाचा ताण प्रभारीवर पडला आहे. जिल्ह्यातील एकूण १६ पैकी नऊ तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. परिणामी, या तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या काळात माहिती देण्यासह विविध योजनांचा लाभ व इतर कामांसाठी कृषी कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत. कृषी विभागाकडे यापूर्वीच दीडशे पेक्षा अधीक योजनांचा भार आहे. अशातच शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या कामांचा भारही त्यांना सहन करावा लागतो.

अशातच पीएम किसान सन्मान योजनेचे कामही कृषी विभागाच्या खांद्यावर आल्याने प्रभारी अधिकार्‍यांची दमछाक होताना दिसत आहे. कृषी आयुक्तालयासह जिल्हा प्रशासनासोबतच्या बैठकीसाठी माहितीची गोळा बेरीज करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

जिल्ह्यात नऊ तालुका कृषी अधिकार्‍यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालक, प्रकल्प संचालक (आत्मा), तिन्ही उपविभागीय कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी (ब) दोन, सहायक प्रशासन अधिकारी एक, कृषी अधिकारी (गट ब) सहा, मंडळ कृषी अधिकारी (गट ब) आठ, सहायक अधिक्षक सहा, वरिष्ठ लिपीक सात, कनिष्ठ लिपीक ११, कृषी पर्यवेक्षक २५, कृषी सहायक ६९, लघूटंकलेखक दोन, आरेखक एक, अनुरेखक ६४, वाहन चालक १७, रोपमळा मदतणीस १६, नाईक एक, ग्रेड (एक) मजूर चार, शिपाई पाहरेकरी ५६ व स्वच्छता एक अशी पदे रिक्त आहेत.

टिएओंची रिक्त पद असलेले तालुके (प्रभारी टिएओ)

बिलोली : बालाजी बच्चेवार, नायगाव : मंजूषा भूमरे, मुखेड : विलास नारनाळीकर, देगलूर : एस. ए. गिरी, कंधार व लोहा : सदानंद पोटपलेवार, मुदखेड : सचिन कपाळे, उमरी : दिलीप जाधव, माहूर : बालाजी मुंडे, टिएओ कार्यरत असलेले तालुके : नांदेड : सिद्धेश्‍वर मोळके, भोकर : विठ्ठल गिते, अर्धापूर : अनिल शिरफुले, किनवट : बालाजी मुंडे, धर्माबाद : सुरेंद्र पवार, हदगाव : आर. डी. रणवीर, हिमायतनगर : विजय चन्ना.

जिल्ह्यातील कार्यरत काही तालुका कृषी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. तर काहींच्या बदल्या झाल्यामुळे १६ पैकी नऊ तालुक्यांचा कारभार प्रभारीवर आहे. कामाचा व्याप लक्षात घेता या ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी मिळाल्यास कामाला गती येईल.

- रवीशंकर चलवदे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT