file Photo 
नांदेड

नांदेड - रविवारी ३५ कोरोना बाधितांची भर, २९ बाधित कोरोनामुक्त 

शिवचरण वावळे

नांदेड - कोरोना आजाराविषयी नागरिक घेत असलेल्या खबरदारीमुळे जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण स्थिर झाले आहे. रविवार (ता. सहा) कोरोना अहवालानुसार ३५ जण पॉझिटिव्ह तर २९ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.  जिल्ह्यात रविवारी (ता.सहा) ७७१ अहवालांपैकी ७०३ अहवाल निगेटिव्ह, जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या २० हजार ५९४ एवढी झाली आहे. 

यातील १९ हजार ५०५ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. एकुण ३४५ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १८ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ५५० व्यक्तींना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. 

बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी - आठ, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण - पाच, हदगाव कोविड रुग्णालय - एक, खाजगी रुग्णालय - पाच, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड - आठ, मुखेड- एक, माहूर -एक असे एकूण २९ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के ७१ अंश इतके आहे. 

रविवार खाटांची संख्या

आजच्या बाधितांमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात २०, लोहा- पाचर, कंधार - दोन, लातूर - एक, नांदेड ग्रामीण - दोन, भोकर - एक, मुखेड -तीन असे एकुण ३५ बाधित आढळले. जिल्ह्यात ३४५ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १३, जिल्हा रुग्णालय ३०, जिल्हा रुग्णालय नवी इमारत - ३३, मुखेड -२९, किनवट- दोन, हदगाव - एक, देगलूर - दोन, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ७९, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १३८, खाजगी रुग्णालय १८आहेत. रविवार खाटांची संख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी १९०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ७८ एवढी आहे. 

नांदेड जिल्हा कोरोना मीटर 

आज पॉझिटिव्ह रुग्ण - ३५ 
आज कोरोनामुक्त - २९ 
आज मृत्यू- शुन्य 
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- २० हजार ५९४ 
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- १९ हजार ५०५ 
एकूण मृत्यू संख्या- ५५० 
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-५८६ 
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-३४५ 
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-१८ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती दर्शनाला जाताय? उद्या सकाळी 7 पासून पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्यात सुरू व्हावा: आमदार सिद्धार्थ शिरोळे, विधानसभेत उठवला आवाज!

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : पश्चिम आशियातील संकटामुळे एप्रिल-जून दरम्यान इंधन विक्रीतून तेल कंपन्यांचे सुमारे ७५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले: हरदीप पुरी

SCROLL FOR NEXT