Nanded Supreme Court order given by Local body election sakal
नांदेड

नांदेड : 'निवडणुकीचे' लागले वेध

स्थानिक स्वराज्य संस्था; इच्छुकांचे गट, गण, प्रभाग रचनेकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम प्रशासनातर्फे सुरू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे निवडणुका होणार असल्यामुळे इच्छुकांनीही पुन्हा गुडग्याला बाशिंग बांधण्यास सुरूवात केली असून त्याचे आता गट, गण, प्रभाग रचनेकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषद, १६ पंचायत समित्या त्याचबरोबर दहा नगरपालिकांची मुदत संपल्यामुळे आगामी काळात होणार आहेत. त्या दृष्टीने सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाकडून त्या दृष्टीने तयारी सुरू झाल्यामुळे आता निवडणुका होणार याचे चित्र स्पष्ट होत असल्यामुळे दुसरीकडे इच्छुकांनी देखील पुन्हा जोर धरण्यास सुरूवात केली आहे. आपल्याला सोयीचा असलेला कोणता गट, गण किंवा प्रभाग आहे, याची चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर त्या दृष्टीने आपआपल्या पक्षांच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडेही संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. काही जणांनी आता पुन्हा आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरूवात केली आहे.

येत्या काही दिवसात अंदाज घेऊन इच्छुक आणि त्यांचे समर्थक हळूहळू प्रचारही सुरू करतील आणि पुन्हा एकदा मतदारराजाची मनधरणी करण्यासाठी आणि त्याला खुश करण्यासाठी प्रयत्न सुरू होतील. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध पक्षांची नेतेमंडळीही कामाला लागले असून आगामी काळात उद्‍घाटन, भूमीपूजन आदी कामांनाही आणखी वेग येण्याची चिन्हे आहेत.

प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणुक आयोगाच्या ता. सहा मे २०२२ च्या पत्रान्वये मे २०२० ते मार्च २०२२ मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या नगरपालिकांच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारीत प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रारुप प्रभाग रचनेवर ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असल्यास त्यांनी कारणासह संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात मंगळवार ते शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यत लेखी सादर कराव्यात. शनिवारी दुपारी तीन वाजेनंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतली जाणार नाही, याची संबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी आतुर ! अमेरिकेने इराणला पाठवला १५ कलमी शांतता प्रस्ताव, काय आहेत अटी ?

Latest Marathi News Live Update : हडपसर परिसरातील कालवा फुटी प्रकरणी जलसंपदामंत्र्यांकडून अभियंत्यांना नोटीस

Chhatrapati Sambhajinagar: हॉटेल सहा हजार, सिलिंडर बाराशेच! हिशेब जुळेना ; पथके करतात तरी काय?

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

Chhatrapati Sambhajinagar:अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती शहरात; धार्मिक वातावरणाची निर्मिती

SCROLL FOR NEXT