nanded taroda Naka fire at Mattress house chicken shop sakal
नांदेड

तरोडा नाका परिसरात गादी घराला आग

धुराचे काळेकुट्ट लोट; चिकनसह इतर पाच दुकानेही खाक

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : तरोडा नाका परिसरात असलेल्या एका गादी घराला शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागली. त्यानंतर लगेच त्याच्या बाजूला असलेल्या चिकन सेंटरला व इतरही दुकानांना आगीने घेरल्याने ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीचे लोळ आणि गर्दी लक्षात घेता अग्निशमन दलाचे अधिकारी रईस पाशा यांनी दीड तास शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. यात जीवीतहानी झाली नसली तरी अंदाजे २० लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भाग्यनगर पोलिस ठाण्यासमोर असलेल्या टीन पत्र्यामधील एका गादी घराला दुपारच्या दरम्यान आग लागली. त्याच्याशेजारी असलेल्या चिकन सेंटरच्या दुकानालाही आगीने आपल्या कवेत घेतले. चार ते पाच दुकानांना आग लागल्याने आगीचा लोळ व धूर मोठ्या प्रमाणात दिसत होता. प्रत्यक्षदर्शीनी तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला ही घटना भ्रमणध्वनीवरून कळवली. अग्निशमन दलाचे अधिकारी रईस पाशा यांनी स्वतः गाडी चालवत घटनास्थळी दाखल झाले.

सोबत दुसरी गाडीदेखील त्यांनी पाचारण केली. दोन गाडीवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आगीमध्ये जवळपास २० लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान जवळपास दीड महिन्याच्या काळात शहरात आग लागल्याच्या एकूण ४६ घटना घडल्या आहेत.

शनिवारी शहरामध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्ती दाखल होणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी अग्निशमक दलाची बैठक चालू होती. परंतु सदरील घटना कळताच कुठल्याही क्षणाचा विलंब न करता रईस पाशा यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणल्याने नागरिकांनी पाशा यांचे अभिनंदन केले. महापालिकेच्या अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे नेहमीच या विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pollution Control : 'नो पीयूसी... नो फ्युएल' उपक्रम प्रभावीपणे राबविणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Latest Marathi News Updates Live: देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इलेक्ट्रिक चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न

PM Narendra Modi: पूराच्या वेदनेत दिलासा ठरली मोदींची भेट; निकिताच्या अश्रूंनी पंतप्रधानांचे मन हेलावले

Pitru Paksha 2025: पितरांची मृत्यू तिथी माहिती नाही? 'या' अमावास्येला करा श्राद्ध, मिळतील पूर्वजांचे आशीर्वाद

Nashik News : सुरक्षित अन्न खा, आरोग्य जपा; नाशिक ‘एफडीए’ची सणासुदीच्या काळात विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT