file photo 
नांदेड

" शाळा बंद पण शिक्षण सुरु " यात उत्कृष्ट आॅनलाईन अध्यापनाचे कार्य करणारे नांदेडचे शिक्षक सन्मानीत 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शनिवार (ता. सहा) रोजी येथे कुसुम सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा अधिवेशन व कोरोना काळात " शाळा बंद पण शिक्षण चालू " यात उत्कृष्ट आॅनलाईन अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रत्येक तालुक्यातून एक असे 16 गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजीराव कल्याणकर, प्रशांत दिग्रसकर, किशोर स्वामी, राजू यन्नम, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदयजी शिंदे, राज्य नेते शिवाजी साखरे, मराठवाडा अध्यक्ष पंडित नागरगोजे, राज्य संघटक नागभूषण दुर्गम व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष तस्लिम शेख सर यांनी केले. जि. प. अध्यक्षा मंगारणी अंबुलगेकर शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने लवकरात लवकर सोडवू व पगारीत विलंब होण्याची तांत्रिक कारणे सांगितले व त्याच्यावर काही मार्ग काढून पगारी पाच तारखेच्या आत करण्याचा प्रयन्त करु असे सांगितले.  

तीन दिवसात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे राज्यसंघटक नागभूषण दुर्गम, जिल्हाध्यक्ष तसलीम शेख, सरचिटणीस सूर्यकांत गच्चे, राजेश भुयारे, व्यकटेश उकरांडे, राजेश कुरमुडे, संजय खानसोळे, बालाजी शिंदे, नामदेव कंधारे, मधुकर बुरपल्ले, प्रशांत भिंगोले, संजय खंडारे, पांडुरंग गंगासागरे, राजेश चिटकूलवार, वाय. जी. देवकर, विश्वदीपक बिजेवार, जे. डी. जाधव, राजू काळे इत्यादीसह अनेक शिक्षकांनी परिश्रम घेतले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT