Nanded Teachers union agitation for old pension kgm00 sakal
नांदेड

नांदेड : जुन्या पेन्शनसाठी शिक्षक संघाचे आंदोलन

मागण्यांचे निवेदन सादर; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (old pension) लागू व्हावी तसेच शिक्षकांच्या इतर प्रलंबीत मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक (Akhil Maharashtra Primary Teacher) संघाच्या वतीने सोमवारी (ता. २७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.राज्यात २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून खंड दोन प्रकाशित करण्यात यावा, नवीन शैक्षणिक धोरणाला शिक्षण व शिक्षक विरोधी तरतुदी वगळाव्यात, समानकाम समान वेतन या न्यायाला धरून शिक्षणसेवक योजना रद्द करणे, सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतश्रेणी लागू करणे, एम.एस.सी. आयटी मुदत वाढविणे, राज्याच्या शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे भरणे, केंद्रप्रमुखांची सर्व रिक्तपदे शिक्षकांतून पदोन्नतीने भरणे, नांदेड जिल्हा परिषदेतील जीपीएफ स्लिपमधील गोंधळ दूर करणे, १२ वर्ष सेवा पूर्ण सर्वाचे चटोपाध्याय वेतश्रेणीचे आदेश काढणे, वर्षानुवर्ष रखडलेली वरिष्ठ वेतश्रेणी सुरू करणे, सहाव्या वेतन आयोगातील हप्ते जमा करणे, वस्ती शाळा शिक्षकांना मुळ नियुक्तीपासून सेवा ज्येष्ठतेचा लाभ मिळावा, रखडलेल्या अंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या व्हाव्यात आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात संघटनेचे राज्य संयुक्त चिटणीस दिलीप देवकांबळे, राज्य संघटक चंद्रकांत मेकाले, जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, सरचिटणीस प्रल्हाद राठोड, कार्याध्यक्ष सुधाकर थडके, कोषाध्यक्ष उमाकांत मैलारे, तुकाराम जाधव यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आदी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police officer kicking protester VIDEO: …अन् पोलिस अधिकाऱ्याने फिल्मी स्टाईलने 'त्या' आंदोलकाच्या कंबरेत घातली लाथ ; व्हिडिओ व्हायरल !

Local Megablock: प्रवाशांनी खबरदारी घ्या! मुंबई लोकलच्या मार्गावर रात्र आणि दिवसाचा मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? जाणून घ्या...

तेजश्रीसोबत नवऱ्याला रोमान्स करताना पाहून काय म्हणाली सुबोधची पत्नी? दिली भन्नाट प्रतिक्रिया, म्हणते- अगं तू...

GST Slab: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! जीएसटीमध्ये मोठा बदल होणार, प्रस्तावही पाठवला, काय स्वस्त होणार?

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT