Nanded Teachers union hold agitation today sakal
नांदेड

नांदेड : शिक्षक संघाचे आज धरणे आंदोलन

शिक्षक संघाची माहिती; जुन्या पेन्शनसह अनेक मागण्या प्रलंबीत

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी तसेच शिक्षकांच्या इतर प्रलंबीत मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी राज्यव्यापी धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

याबाबत संघटनेच्या वतीने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून खंड दोन प्रकाशित करण्यात यावा, नवीन शैक्षणिक धोरणाला शिक्षण व शिक्षक विरोधी तरतुदी वगळाव्यात, समानकाम समान वेतन या न्यायाला धरून शिक्षणसेवक योजना रद्द करणे, सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतश्रेणी लागू करणे, एम.एस.सी. आयटी मुदत वाढविणे, राज्याच्या शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे भरणे, केंद्रप्रमुखांची सर्व रिक्तपदे शिक्षकांतून पदोन्नतीने भरणे, नांदेड जिल्हा परिषदेतील जीपीएफ स्लिपमधील गोंधळ दूर करणे, १२ वर्ष सेवा पूर्ण सर्वाचे चटोपाध्याय वेतश्रेणीचे आदेश काढणे, वर्षानुवर्ष रखडलेली वरिष्ठ वेतश्रेणी सुरू करणे, सहाव्या वेतन आयोगातील हप्ते जमा करणे, वस्ती शाळा शिक्षकांना मुळ नियुक्तीपासून सेवा ज्येष्ठतेचा लाभ मिळावा, रखडलेल्या अंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या व्हाव्यात आदी मागण्यांसाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

प्रदेशाध्यक्ष देवीदास बस्वदे यांच्यासह राज्यसंघ पदाधिकारी दिलीप देवकांबळे, राज्य संघटक चंद्रकांत मेकाले यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेडला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली. या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक, कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, सरचिटणीस प्रल्हाद राठोड, कार्याध्यक्ष सुधाकर थडके, कोषाध्यक्ष उमाकांत मेलारे आदींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT