file photo 
नांदेड

नांदेड : निष्पापावर अन्याय होणार नाही; मात्र दोषींना सोडणार नाही- पोलिस अधीक्षकांची तंबी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : मिरवणुकीदरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ला प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र निष्पाप व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येत असून गुन्हेगारांना कुठल्याही परिस्थितीत सोडल्या जाणार नाही. येणाऱ्या काळात असे प्रकार घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासन व सर्व धर्मियांनी एकत्रित पणे दबाव निर्माण करावा असे आवाहन पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केले आहे.

ता. 29 मार्च रोजी एका धार्मिक मिरवणुकीत काही तरुणांच्या टोळक्याने पोलिसांवर तलवार आणि भाल्याने हल्ला केला होता. या प्रकरणात पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. अनेक जणांना अटक केली असून काहिंचा शोध सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी गुरुवारी (ता. एक) शीख समाजातील काही जणांना बोलावून चर्चा करण्यात आली.

बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह शीख समाजातील रणजीतसिंग कामठेकर, गुरुचरणसिंग मोहनसिंग गाडीवाले, रवींद्रसिंग मोदी, दिलीपसिंग सोडी, अर्जितसिंग कडेवाले, नारायणसिंग नंबरदार, लक्ष्मणसिंग रा, बलविंदरसिंग ढील्लो आदींची उपस्थिती होती. पोलिसांच्या तपासणीत अनेक घरातून पूजेची शस्त्रे जमा करण्यात आली आहेत, त्याबाबत आक्षेप घेण्यात आला. अनेकांच्या घरी रात्री- बेरात्री पोलिस जात आहेत त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. काही लोकांनी केलेल्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी मानले जात आहे. संस्कार देणे ही आई- वडिलांची जबाबदारी आहे परंतु त्यामध्ये कुठेतरी कमतरता येते अशी प्रतिक्रिया उपस्थित शीख समाजातील नागरिकांनी दिली. तसेच पोलिसांना सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी पोलिस अधीक्षक शेवाळे म्हणाले की, या प्रकरणात शीख समाज आणि पोलिसांनी गुंडगिरीविरुद्ध लढले पाहिजे. तसा दबाव तयार करावा लागेल. शहराची शांतता बाधीत होणार नाही यासाठी आम्ही सतर्क असून या शांततेला गालबोट लावणाऱ्यांना सोडणार नाही. निष्पाप नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेत असून शांतता भंग करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT