Nanded tribal educated Unemployment Shabari Tribal Finance and Development Corporation  sakal
नांदेड

Nanded News : आदिवासी सुशिक्षित बेरोजगारांचे २८ लक्ष परत; चालू वर्षाचा लक्षांक अप्राप्त

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळास पात्र लाभार्थी मिळेनात!

स्वप्नील भालेराव

किनवट : येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पात्र लाभार्थी न मिळाल्यामुळे मागील वर्षाचे २८ लक्ष रुपये राज्य सरकारला परत करण्यात आले. तालुक्यात हजारो सुशिक्षीत बेरोजगार असतांनाही शबरी महामंडळाच्या योजनांची माहिती प्रशासनाकडून गाव, वाडी, वस्ती, पाड्यांपर्यंत पोहचू न शकल्यामुळे अनेक आदिवासी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कर्ज योजनेपासून वंचित रहावे लागत आहे.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अनुसुचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांना त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचाविण्यासाठी आणि स्वंयरोजगारासाठी अल्प व्याजदराने राष्ट्रीय अनुसुचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली पुरस्कृत कर्ज योजना राबविण्यात येते.

नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यातील आदिवासी सुशिक्षित बेरोजगारांसाठी सन २०२०- २१ या वर्षांकरिता एकुण ५८ लक्षांक शबरी महामंळास प्राप्त झाला. आणि २०२१- २२ या आर्थिक वर्षात कर्ज पुरवठा करण्यात आला. त्या योजनेकरिता एकुण ९५ लक्ष १० हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ६७ लक्ष १० हजार रुपये या कर्ज योजनेवर खर्च करण्यात आले, मात्र पात्र लाभार्थी न मिळाल्यामुळे २८ लक्ष रुपये राज्य सरकारला परत करण्यात आले.

वरीष्ठ कार्यालयांकडून प्रादेशिक महामंडळाला अद्यापही लक्षांक आणि निधी प्राप्त झाला नाही. तेव्हा शासनाने त्वरीत लक्षांक व निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून होत आहे.

कोणत्या योजनेवर किती खर्च महिला सशक्तीकरण योजनेसाठी प्रति लाभार्थी १ लक्ष रुपये प्रमाणे २२ लाभार्थ्यांना २२ लक्ष मंजूर करण्यात आले. तर लहान उद्योगासाठी प्रति लाभार्थी २ लक्ष प्रमाणे ८ लाभार्थ्यांना १६ लक्ष कर्ज देण्यात आले. तसेच हॉटेल,ढाबा, स्पेअर पार्ट,अॅटो गॅरेज, वर्क शॉप व स्वंय सहाय्यता बचत गटांना व्यवसायांसाठी प्रति लाभार्थी ५ लक्ष प्रमाणे ४ लाभार्थ्यांना २० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. आणि प्रवाशी वाहन व्यवसायासाठी एका लाभार्थ्यास ९ लक्ष १० हजार रुपये कर्ज पुरवठा करण्यात आला.

“माहे फेब्रुवारी – मार्च महिन्यात चालू वर्षाचा लक्षांक प्राप्त होण्याची शक्यता आहे.”

- पी.सी. राठोड, प्रभारी, शाखा व्यावस्थापक, शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ, किनवट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

SCROLL FOR NEXT