file photo 
नांदेड

नांदेड : सासरच्या छळाला कंटाळून दोन विवाहितांची आत्महत्या 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सासरच्या त्रासाला कंटाळून दोन विवाहितानी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. या प्रकरणी एक घटना भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर दुसरी घटना नांदेड ग्रामिण पोलिसांच्या हद्दीत घडली. याप्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुजाता उर्फ राणी भारत ढोले (वय २१) राहणार तरोडा खुर्द या महिलेने एक नोव्हेंबर रोजी आपल्या सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संभाजी खोबराजी पोहरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सुजाताचे लग्न भारत विश्वनाथ ढोले (वय २५) सोबत झाले होते. पण लग्नानंतर तिला सासरी काही दिवस चांगले नांदवले. त्यानंतर शारीरिक व मानसिक छळ करून घर बांधण्यासाठी माहेरहून एक लाख रुपयांची मागणी केली. यावरुन तिचा छळ अधिक सुरू झाला. या छळाला कंटाळून तिने अखेर आत्महत्या केली. तिच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या सासरच्या मंडळीनीविरुद्ध भाग्यनगर पोलिसांनी सुजाताचा नवरा भारत विश्वनाथ ढोले, सासरा विश्वनाथ ढोले, सासु शिवनंदा, चुलत सासरा शामराव निवृत्ती ढोले, शामरावची पत्नी, भास्कर विश्वनाथ ढोले, सासऱ्याची बहीण भीमा आणि ननंद या सर्वाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल भोसले तपास करत आहेत.

पती व सारऱ्याला अटक केली 

तर दुसऱ्या घटनेत मुदखेड येथील अंकिता हिचे लग्न विष्णुपूरी (ता. नांदेड) येथील दिपक अनंतवार याच्यासोबत ता. आठ मे २०२० रोजी झाले होते. लग्नानंतर लगेच तिचा छळ सुरु केला. कर्ज काढण्यासाठी व मेडीकल दुकान टाकण्यासाठी माहेराहून दोन लाखाची मागणी करुन तिचा मानसिक व शारिरीक छळ सुरु केला. सततच्या छळाला कंटाळून अंकिता हिने आपल्या राहत्या घरी ता. चार नोव्हेंबर रोजी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. गोविंद नातेवाड यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात पती, सासरा व अन्य नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन पती व सारऱ्याला अटक केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT