file photo 
नांदेड

नांदेड : निधी नसल्याने ‘उमेद’च्या योजना झाल्या नाउमेद

प्रमोद चौधरी

नांदेड ः महिलांच्या सामाजिक, आर्थिक विकासाला दिशा देणारे अशी ‘उमेद’ अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची ओळख आहे. केंद्रपुरस्कृत या अभियानाला केंद्र सरकार दरवर्षी ६० टक्के तर राज्य सरकार ४० टक्के निधी देते. केंद्र शासनाने आपला वाटा दिला असला तरी राज्य सरकारने आर्थिक अडचणीचे कारण समोर करून निधीच दिला नाही. मागील डिसेंबर महिन्यापासून विविध योजनांचा निधीच मिळाला नसल्याने ‘उमेद’च्या विविध योजनांना खीळ बसली आहे.

‘उमेद’अंतर्गत एनआरईटीपी (राष्ट्रीय आर्थिक परिवर्तन प्रकल्प) हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत बचतगटांना उद्योगक्षम बनविणे, त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देणे, खेळते भांडवल कर्ज रूपात देणे, उत्पादक संघ तयार करणे, त्यांना खेळते भांडवल देणे यासह अन्य काही बाबींचा समावेश आहे. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी केंद्र सरकार उपलब्ध करून देते. यंदा केंद्र सरकारने आपल्या वाट्याचा निधी दिला. मात्र, राज्य सरकारने हा निधी अद्याप दिला नाही. त्यामुळे हा उपक्रम सध्या थंडबस्त्यात पडून आहेत.

दिनदयाल ग्रामीण कौशल्य योजना हा एक महत्त्वाचा उपक्रम उमेदचा आहे. त्याद्वारे मागणी आधारित, विशेषतः व्यवसायाभिमूख प्रशिक्षण बचतगटांतील महिलांना देण्यात येते. मात्र, यंदा या योजनेतून एकही प्रशिक्षण घेण्यात आले नाही. दिनदयाल व एनआरईटीपी अशा दोन्ही योजनांसाठी मागील डिसेंबर महिन्यांपासून निधीच मिळाला नाही. आता तर कोरोनाचे कारण समोरू करून राज्य सरकारने निधी अडवून ठेवला आहे.

अभियानाची व्याप्ती

महिलांचा सामाजिक, आर्थिक विकासासाठी २०१३ मध्ये उमेद अभियान सुरू करण्यात आले. आज राज्यभरात उमेद अभियानाच्या जवळपास पाच लाख बचतगट आहेत. जवळपास पन्नास लाखांहून अधिक महिला या अभियानाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या जुळल्या आहेत.

अभियान सुरू झाल्यावर राज्यभरात पाच हजार कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली. त्यांच्याच प्रयत्नांमुळे हे अभियान यशस्वीपणे सुरू होते. मात्र, अभियानाच्या यशस्वितेसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही महिन्यांपूर्वी घरचा रस्ता दाखविण्यात आला. त्याविरोधात महिलांनी मोठे आंदोलनही केले होते. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT