Nanded umri municipal corporation election sakal
नांदेड

नांदेड : आरक्षण सुटताच नगरसेवक पदासाठी हालचाली सुरू

गोरठेकर गटात हालचालीला वेग, मात्र काँग्रेस पक्षात अद्यापही थंड परिस्थिती

प्रल्हाद हिवराळे

उमरी : उमरी येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आरक्षण जाहीर झाले. यात अनेक इच्छुकांनी आरक्षणानुसार नगरसेवक पदासाठी इच्छुकांकडून वाढ होण्याची स्पर्धा सुरू झाली. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने सोमवारी सकाळी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले. दहा प्रभागांमध्ये २० सदस्य निवडले जाणार आहेत.

सत्ताधाऱ्यामध्ये मोठ्याप्रमाणात हालचाली सुरू झाल्या असून पालिकेवर आपलीच सत्ता येणार या आशेने प्रभाग फेररचना आपल्या मनाप्रमाणे प्रभाग सोडून इकडचे मतदान तिकडे करुन आपले कसे नगरसेवक निवडून येतील यात व्यूहरचने प्रमाणे कामही सुरू केले. मात्र विरोधी काँग्रेस पक्षात पालिकेच्या निवडणुकीत काम कोण करायचे यात अजुन पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले नसल्याने जशास तसे दिसते.

यातील विविध प्रवर्गातील १० महिला नगर परिषदेच्या सदस्य राहणार आहेत. शहरातील ज्या प्रभागात पुरुष वर्गातील कार्यकर्ते इच्छुक होते, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी तयारी सुरू केली होती, पण त्याच ठिकाणी आरक्षण सोडतीमध्ये महिलांसाठी जागा आरक्षित झाल्यामुळे या इच्छुकात हिरमोड झाला. काहीचे प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागात आपले हक्काचे मतदान नसल्याने बऱ्याच जणांची गोची होणार आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील पुरुष उमेदवाराला पहिल्यांदाच प्रभाग क्रमांक सहामधून संधी मिळाली. तेथेही गोची झाली, आपला प्रभाग बरोबर होईल या आशेने अगोदरपासून निवडणुकीची तयारी करणारे कार्यकर्ते अडचणीत आले आहेत. तसेच प्रभाग रचनेमध्ये बदल झाल्याने काही माजी सदस्यांना आता त्या प्रभागातून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करावी लागणार आहे.

आपले हक्काचे मतदान नसल्याने बऱ्याच जणांची गोची होणार आहे. त्यामुळे नवीन उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील पुरुष उमेदवाराला पहिल्यांदाच प्रभाग क्रमांक सहामधून संधी मिळाली. ओबीसी आरक्षणाशिवाय या नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या प्रवर्गातील पुरुष व महिलांना त्या-त्या राजकीय पक्षांतर्फे सर्वसाधारण आरक्षित प्रवर्गामध्ये संधी द्यावी लागेल. शेवटी या निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांचे कार्य व त्यांचा जनसंपर्क हाही तेवढाच महत्त्वाचा भाग राहणार आहे.

जनसंपर्क तेवढाच महत्त्वाचा

बऱ्याच ठिकाणी महिला आरक्षण झाल्याने त्यांच्या पतीराजला त्यांचे पीए म्हणून निवडून आल्यानंतर काम पाहण्याची वेळ येणार त्यातच पती न्यता मानावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT