Nanded Use chemicals for growing mangoes Consumer Health Risk
Nanded Use chemicals for growing mangoes Consumer Health Risk  sakal
नांदेड

नांदेड : आंबे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : बाजारातील चमकदार व पिवळा रसरशीत आंब्यांच्या बाबतीत दिसते तसे नसते म्हणून जग फसते ही म्हण तंतोतंत लागू होते. कारण असे बहुतांश आंबे दिसायला आकर्षक असले तरी ते शरीराला अपायकारक ठरू शकतात. आंबा लवकरात लवकर तयार होण्यासाठी काही रसायनांचा वापर केला जातो. मात्र, त्यांचा वापर करून पिकविलेले आंबे किडनी, लिव्हर यासाठी त्रास देणारे ठरू शकतात, असे वैद्यकित तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या नांदेडच्या बाजारात केशर, दशहरी, हापूस, लंगडा, पायरी, बदाम, गावरान अशा विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. हे आंबे शहरातील विविध भागांत असलेल्या छोट्या गोदामामध्ये उतरविण्यात येतात. त्यामधील काही ट्रकमधील आंबे उतरण्यापूर्वीच केमिकलचा वापर करून पिकविलेले असतात. परंतु, हे आंबे न पिकता केवळ त्यांना पिवळा, लाल रंग येतो. कच्च्या आंब्यावर बंदी असलेले कॅल्शिअम कार्बाईड व परवानगी असलेल्या इथिलिनचा वापर केल्यामुळे आंबा लवकर पिकतो. मात्र ते आंबे शरीरासाठी अपायकारक आहेत.

कायद्यानुसार गुन्हा

बंदी असलेल्या रसायनाने आंबे व इतर फळे पिकविणे हा अन्नसुरक्षा व मानके या कायद्यानुसार गुन्हा आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तीला पाच वर्षाची शिक्षा व लाखो रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. मात्र, कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे रसायनांचा सर्रासपणे वापर होत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

केमिकलने पिकविलेल्या फळांच्या सेवनामुळे स्लो पॉयझनिंग होते. याची तीव्रता कमी प्रमाणात असली तरी दीर्घकालीन आजार उद्भवू शकतात. त्यात कर्करोग, घसात खवखव पेस्टिक अल्सर, मळमळणे, अपचन, चक्कर येणे, झोप न येणे, स्मरणशक्ती कमी होणे असे विविध आजार होऊ शकतात.

- डॉ. गजानन कुलकर्णी, नांदेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाचा विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT