file photo 
नांदेड

नांदेड : विमानतळ रस्त्यावर वाटमारी, मोबाईलससह रक्कम लंपास

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरातून उपचार घेऊन परतणाऱ्या तरुणीसह तिच्या भावाची दुचाकी अडवून लुटमार केली. ही घटनाि शिवमंदीर ते कामगार पुतळा दरम्यान रेल्वे विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ता. १३ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात तिन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील एका रुग्णालयात उपचार घेऊन दुचाकीवरुन घराकडे परत जाणाऱ्या बहिण- भावाला रेल्वेच्या विभागीय कार्यालयाजवळ आडवून चाकूचा धाक दाखविण्यात आला. त्यानंतर त्यांच्या जवळील मोबाईल आणि दोन सोन्याच्या अंगठ्या व काही रक्कम काढून घेण्यात आल्या. ता. 12 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. गौरव बालाजी देशमुख राहणार सिद्धार्थनगर, सांगवी या तरुणाची बहीण शहरातील एका खआसगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. ता. १२ नोव्हेंबर रोजी बहिणीला सुट्टी मिळाल्याने गौरव हा तिला दुचाकीवरुन घेऊन घराकडे परत येत होता. त्याच वेळी रेल्वेच्या विभागीय कार्यालयाजवळ तो पोहचताच त्याच्या पाठीमागून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले.

चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि अंगठ्या काढून घेण्यात आल्या. या प्रकरणात गौरव देशमुख यांच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत एका मजुराला मारहाण करुन लुटल्याची घटना शामननगर महिला रुग्णालयासमोर घडली. नेहाल अशोक कांबळे राहणार सिद्धार्थनगर हा ता. १३ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास श्यामनगर येथील महिला रुग्णालयाबाहेर थांबला असता अनोळखी दोघआंनी येऊन त्याच्याशी वाद घआलून डोक्यात राॅडने मारून जखमी केले. त्याच्या जवळचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला. या हल्ल्यात नेहाल कांबळे हा जखमी झाला. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदास हे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

SCROLL FOR NEXT