Nanded News Sakal
नांदेड

Nanded News: शंभर टक्के व्याज माफीसाठी राहिले शेवटचे चार दिवस

महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या वीज ग्राहकांना थकबाकीत सवलत देणाऱ्या विलासराव देशमुख अभय योजनेच्या माध्यमातून खंडीत झालेला वीजपुरवठा पुर्ववत करून घेण्यासाठी आता केवळ चारच दिवस शिल्ल्क राहिले आहेत. महावितरणने मार्चमध्ये सुरू केलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी ता. ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख असून ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता अनिल डोये यांनी केले आहे.(Nanded News)

खंडीत झालेला वीजपुरवठा पुर्ववत करून घेण्यासाठी नांदेड परिमंडळातील दोन हजार ८६८ वीज ग्राहकांनी योजनेत सहभागी होत तीन कोटी ५६ लाख रूपयांची थकबाकी भरून पुन्हा आपले उद्योग, व्यवसाय सुरू करण्याचा लाभ घेतला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील एक हजार १०७ तर परभणी एक हजार ८२ आणि हिंगोली जिल्ह्यातील ६७९ वीज ग्राहकांचा समावेश आहे. या वीजग्राहकांना दोन कोटी ८७ लाख रूपयांची सुट या योजनेच्या माध्यमातून मिळाली आहे. या योजनेत सहभागी झालेल्या नांदेड जिल्ह्यातील एक हजार १०७ ग्राहकांकडे एक कोटी २४ लाख रूपयांची थकबाकी होती. या ग्राहकांना २८ लाख ३९ हजार रूपयांची सुट मिळाली आहे.

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत झालेल्या ग्राहकांना सवलत आणि पुनर्जोडणीची संधी आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना महावितरणच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी. या योजनेत सुलभ हप्त्याने रक्कम भरावयाची सुविधा आहे परंतु त्यासाठी मुद्दलाच्या ३० टक्के रक्कम एक रक्कमी भरणे अत्यावश्यक आहे. ग्राहकांना उर्वरीत रक्कम सहा हप्त्यात भरता येईल. या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT