Nanded Waghala Municipal Corporation meeting 
नांदेड

नांदेड महापालिकेची गाजली सभा

बापूराव गजभारे निलंबित; काय ते रस्ते, काय ते खड्डे, काय ती टक्केवारी...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेची शुक्रवारी दुपारी तीन वाजता झालेल्या सभेत अनेक विषयांवर चर्चा होऊन गदारोळ आणि गोंधळही झाला. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दरम्यान, काय ते रस्ते, काय ते खड्डे, काय ती टक्केवारी असे म्हणत नगरसेवक बापूराव गजभारे यांनी महापौरांच्या दिशेने पत्रक भिरकाऊन सभात्याग केला. त्यामुळे त्यांना पुढील दोन सभेसाठी निलंबित करण्यात आले. सभागृहात अधिकाऱ्यांकडून केवळ खुलासे सादर होत असल्याने महापौर जयश्री पावडे यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला.

महापालिकेच्या डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात दुपारी तीन वाजता महापौर पावडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. यावेळी उपमहापौर अब्दुल गफार, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, नगरसचिव अजितपालसिंग संधू आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आयुक्त डॉ. सुनील लहाने मुंबईला गेल्यामुळे गैरहजर होते. प्रारंभी स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांचे वडील मल्लीकार्जुन स्वामी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव विरोधी पक्षनेते रावत यांनी मांडला पण तो महापौर पावडे यांनी फेटाळून लावत पुढच्या सभेत घेऊ असे सांगितले. त्यानंतर शहरातील विविध समस्यांच्या प्रश्नांनी सुरूवात झाली. त्यात प्रशासन कोणतीच कामे वेळेत मार्गी लावत नसल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या. पाणीपुरवठ्यासह मुलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासे करण्यात आले मात्र त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे महापौर पावडे याही संतप्त झाल्या. नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सन्मान कंपनीविरूद्ध कारवाई करा अशा सूचना त्यांनी दिल्या. सभा झाल्यानंतर आयुक्तांशी चर्चा करून पदाधिकारी आणि सदस्यांच्या भावना कळविण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त श्री. मनोहरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल तब्बल 10 रुपये स्वस्त! तुमच्या शहरात आजचा दर किती?

Kagal Politics : हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? CM फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टच सांगितली पडद्यामागची कहाणी

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

SCROLL FOR NEXT