नांदेड - महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पाची सभा बुधवारी सायंकाळी आॅनलाइन घेण्यात आली. 
नांदेड - महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पाची सभा बुधवारी सायंकाळी आॅनलाइन घेण्यात आली.  
नांदेड

नांदेड वाघाळा महापालिकेचा अर्थसंकल्प एक हजार कोटींचा होणार  - सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले

अभय कुळकजाईकर

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या मुळ आणि सुधारित अर्थसंकल्पाला स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी बुधवारी (ता. २४) मंजुरी दिली. लवकरच हा अर्थसंकल्प विशेष अर्थसंकल्पीय सभेत महापौरांना सादर करण्यात येणार आहे. प्रशासनाने ६४५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात जवळपास साडेतिनशे कोटींची भर घालत हा अर्थसंकल्प एक हजार कोटींचा होण्याची शक्यता सभापती गाडीवाले यांनी वर्तवली. 

नांदेड वाघाळा महापालिकेचा प्रशासनातर्फे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी ता. दहा मार्च रोजी स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांना अर्थसंकल्प सादर केला होता. २०२० - २१ चा मूळ अर्थसंकल्प हा ८९४ कोटी २४ लाख रुपयांचा होता. तो सुधारित ६७८ कोटी ३५ लाख रुपयांचा होत आहे. तसेच २०२१ - २२ या वर्षीचा ६४५ कोटी ५७ लाख रुपयांचा आणि एक लाख ७६ हजार ६५४ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर स्थायी समितीचे सभापती गाडीवाले आणि सदस्यांनी त्यावर अभ्यास करून अर्थसंकल्प तयार केला. 

तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांची वाढ - गाडीवाले
स्थायी समितीच्या सदस्यांनी उत्पन्नवाढीसाठीच्या काही सूचना केल्या त्याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून येणाऱ्या निधीबाबतही चर्चा केली. त्याचबरोबर बुधवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या सभेत अर्थसंकल्पाबाबतच्या सूचना करून मंजुरीचे सर्वाधिकार हे सभापतींना देण्यात आले. त्यानुसार सभापती गाडीवाले यांनी या अर्थसंकल्पात भर टाकत महापालिकेचे स्वतःचे उत्पन्न त्याचबरोबर राज्य सरकारकडून येणारा निधी यांची सांगड घालत त्यात आणखी तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांची वाढ करून एक हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होणार असल्याची माहिती श्री. गाडीवाले यांनी दिली. 

यांची होती उपस्थिती
यावेळी नगरसेवक अमितसिंह तेहरा, उपायुक्त डॉ. बाबुराव बिक्कड, मुख्य लेखा परिक्षक टी. एल. भिसे, मुख्य लेखाधिकारी अश्विनी नराजे, लेखाधिकारी शोभा मुंढे, सहायक संचालक नगररचना गर्जे, वरिष्ठ लिपिक झुल्फेकार, सतिश कंठाळे आदी उपस्थित होते. उर्वरित सदस्यांनी आॅनलाइनद्वारे सहभाग नोंदवला. यावेळी आयुक्त डॉ. सुनील लहाने हे देखील आॅनलाइन सहभागी झाले होते. त्यांच्या प्रकृतीचीही विचारपूस यावेळी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT