file photo 
नांदेड

नांदेड : वखारचे गोदाम बंद होणार- हमाल, मापाडी कामगारांमध्ये खळबळ

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरापासून जवळच नायगाव रस्त्यावरील तुप्पा येथे असलेल्या केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम बंद करण्याबाबतच्या हालचालींना वेग घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या शेकडो हमालांच्या रोजगारांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. गोदाम बंद करण्यात येऊ नये अशी मागणी हमाल मापाडी हातगाडा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

तुप्पा येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामाची ता. २९ ऑक्टोबर ते ता. एक नोव्हेंबर या कालावधीत तपासणी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या पथकाने सदर गोदाम बंद करण्याचा अहवाल शासनाकडे दिल्याबाबतची माहिती संघटनेला मिळाली. त्यामुळे या गोदामात काम करणाऱ्या हमालांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे धान्य गोदाम बंद करु नये अशी मागणी हमाल मापारी हातगाडा संघाचे भुजंग कसबे, प्रभाकर वाघमारे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

केंद्रीय वखार महामंडळाचे धान्य गोदाम २००६ पासून सुरु आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना अचानकपणे हे गोदाम बंद कशासाठी होत आहे हा प्रश्न पुढे आला आहे. गेल्या १४ वर्षाच्या काळात या गोदामाची कोणतीही तक्रार नव्हती. दरवर्षी विविध विभागातर्फे निरीक्षण केले जाते. हे मुद्दाम बंद झाल्यास जवळपास२०० हून अधिक कामगार कुटुंबीयांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; इराणवरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवले, मध्यपूर्वेतील तणाव होणार कमी?

मोठी बातमी! जमिनीच्या प्रत्येक पोटहिश्श्याची मोजणी आता 200 रुपयांत होणार; महसूल विभागाचा निर्णय, 7/12 उताऱ्यावरील सर्वांच्या संमतीची अट, वाचा...

आजचे राशिभविष्य - 27 मार्च 2026

Shikhar Shingnapur: शिखर शिंगणापूरच्या कळसाला मानाचा ध्वज; ‘हर हर महादेव’चा जयघोष, मध्यरात्री शिवपार्वती विवाह, काय आहे पारंपरिक प्रथा?

Quick and Healthy Breakfast: लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल! झटपट बनवा प्रोटीनने भरपूर 'मसूर कटलेट्स'; हेल्दी आणि चवदार नाश्ता

SCROLL FOR NEXT