file photo 
नांदेड

नांदेड : हस्सापुर शिवारातील वळण रस्त्याचे काम मूळ नकाशाविरुद्ध- शेतकरी आंदोलनाच्या तयारीत 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराच्या पश्चिम रस्त्यातील भूसंपादनाचे काम हस्सापूर शिवारातून मूळ नकाशाप्रमाणे होत नसल्याची तक्रार हस्सापुर येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे गुरुवार ( ता. १०) केली आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाच्या या गलथान कारभारामुळे हिंदु- मुस्लीम या दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे शेतकरी बोलुन दाखवत आहेत.  

नांदेड शहराला अगदी लागून असलेल्या हस्सापुर शिवारातील भूसंपादनाचे निवेदन उत्तम भिमराव काकडे, भगवान देविदास भोसले आणि सिमरजितसिंग कालरा या शेतकऱ्यांनी दहा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले. हस्सापुर शिवारातून जाणारा पश्चिम वळण रस्त्याची रुंदी दीडशे फूट अर्थात ४५ मीटर आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सत्तर फूट रुंदीच्या एका धार्मिक स्थळामधून रस्त्याची आखणी करुन रस्ता अरुंद करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मूळ नकाशाप्रमाणे काम व्हावे अशी अपेक्षा

या भागातील हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही धर्मांच्या धर्मस्थळांच्या मध्यभागातून बेकायदेशीरपणे रस्ता तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शासनाने मंजूर केल्यामुळे नकाशा बघून काही नवीन करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रयत्न दोन गटांमध्ये भेदभाव तयार करणार आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले की विनाकारण रस्त्याला वळण देणे, चुकीचे वळण घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने औरंगाबाद येथील कंपनीस नकाशा करण्यासाठी बोलावले आहे. ही कंपनी चुकीचे काम करत असून त्याला रोखण्यात यावे याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले आहे. यापूर्वी सन २०१७ व २०१९ मध्ये सुद्धा निवेदन दिलेले आहेत. त्यात मूळ नकाशाप्रमाणे काम व्हावे अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KCC Loan: शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंतचे किसान क्रेडिट कार्ड कर्ज कधीपासून मिळणार? मोठी अपडेट आली समोर

कधी मालिका, कधी नाटक; सहा राज्य चित्रपट पुरस्कार जिंकणारी 'ही' अभिनेत्री 'माया' मध्ये साकारणार मुख्य भूमिका

BMC Election: राहुल नार्वेकरांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव? आठ उमेदवारांची न्यायालयात धाव; तातडीच्या सुनावणीस नकार

Siddheshwar Yatra 2026: यंदा सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा 13 की 14 जानेवारी? जाणून घ्या मुख्य पूजा विधी

Latest Marathi News Live Update : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी 13 तारखेला मुख्यमंत्र्यांचा नागपुरात एक खास रोड शो

SCROLL FOR NEXT