नांदेड जिल्हा परिषदेत पाण्याचा दुर्भिक्ष. esakal
नांदेड

Nanded News : जिल्हा परिषदेतच पाणीटंचाई!

Water Supply in Nanded : दोन टँकरने केला जातोय पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा

Nanded : नांदेड जिल्हा परिषदेत मागील दहा दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. कर्मचाऱ्यांसोबतच अभ्यांगतानाही तोंड द्यावे लागत आहे. स्वच्छतागृहात पाणी नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. दरम्यान, मह‍िला कर्मचाऱ्यांच्या रेट्यानंतर प्रशासनाने दोन दिवसांपासून टँकर सुरू केले आहेत.

मागील पंधरा दिवसांपूर्वी नांदेड शहरवासीयांचे कृत्रिम टंचाईने तोंडचे पाणी पाळले होते. आता काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे चित्र आहे. एकिकडे उन्हाचा पारा वाढत असताना शहरासह जिल्‍ह्यात अनेक ठिकाणी भिषण टंचाई आहे.

आता यात जिल्हा परिषदही मागे राहिली नसून मागील दहा दिवसापासून बोअर अटल्याने टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेत कामासाठी शहरासह जिल्हाभरातून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या टंचाईला कर्मचाऱ्यांसोबतच अभ्यांगतानाही तोंड द्यावे लागत आहे.

स्वच्छतागृहात पाणी नसल्याने सर्वत्र दुर्गंध येत होती. पाणी नसल्याने शेवटी स्वच्छतागृहांना कुलूप लावण्यात आले, अशी विदारक परिस्थ‍िती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यांना कठिण जात होते. महिला कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन प्रशानाकडे उपाय योजना करण्याची मागणी केली. त्यांच्या रेट्यानंतरच प्रशासनाने दोन द‍िवसांपासून दोन टँकरने पाणी सुरू केले आहे.

कूलरमध्ये पाणी अन् स्वच्छतागृहाला कुलूप

या भीषण टंचाईतही प्रत्येक विभागात कुलर लावण्यात आले आहेत. एकिकडे स्वच्छतागृहाला पाण्याअभावी कुलूप तर, दुसरीकडे कुलरमध्ये पाणी टाकण्यात येत आहे, त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगतामधून संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT