Nanded Zilla Parishad 75 employees Transfer
Nanded Zilla Parishad 75 employees Transfer sakal
नांदेड

नांदेड : जिल्हा परिषदेत ७५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्‍हा परिषद सार्वत्रिक बदल्‍यांमध्ये कृषी विभागाच्या आठ तर सामान्य प्रशासन विभागातील ६७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या शनिवारी समुपदेशनाने करण्यात आल्या आहेत.नांदेड जिल्‍हा परिषदेतंर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचा-यांच्‍या सार्वत्रिक बदली प्रक्रिया समुपदेशनाव्‍दारे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सुरू झाल्या आहेत.

शनिवारी कृषी व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात कृषी विभागाच्या आठ तर सामान्य प्रशासन विभागातील ६७ अशा एकूण ७५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्‍यात आल्‍या आहेत.

कृषी विभागातील कृषी अधिकारी पदाच्‍या विनंतीवरुन दोन, विस्तार अधिकारी कृषी या पदाच्या सहा बदल्या झाल्या असून यात प्रशासकीय कारणावरून तीन तर विनंतीवरून तीन बदल्यांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन विभागातील ६७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्‍यात आल्‍या. यात कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांच्या विनंतीने चार बदल्या झाल्‍या तर वरिष्ठ सहाय्यक पदाच्या १३ बदल्या करण्‍यात आल्‍या. यात प्रशासकीय कारणावरून एक तर विनंतीवरून १२ बदल्या केल्या. कनिष्ठ सहाय्यक पदाच्या ५१ बदल्या करण्यात आल्या. यात १४ प्रशासकीय तर ३७ बदल्या विनंतीवरुन झाल्‍या आहेत.

बदली प्रक्रियेत यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, महिला व बालकल्‍याण विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, जिल्‍हा कृषी अधिकारी तानाजी चिमनशेट्टे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT