Nanded Zilla Parishad 84 employees Transfer sakal
नांदेड

नांदेड : ८४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषद; प्रशासकीय ४७ तर विनंती ३७ बदल्यांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्‍हा परिषद सार्वत्रिक बदल्‍यांमध्ये सोमवारी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय ४७ तर विनंतीवरून ३७ अशा एकूण ८४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

जिल्‍हा परिषदेतंर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचा-यांच्‍या सार्वत्रिक बदली प्रक्रिया ता. २० मे पासून सुरुवात झाली. पहिल्यांदाच राजकीय हस्तक्षेपाशिवाय समुपदेशनाव्‍दारे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बदल्या पारदर्शक पद्धतीने होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आहे.

सोमवारी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय तीन तर विनंती चार अशा एकूण सात, आरोग्य सहाय्यका प्रशासकीय एक व विनंती तीन अशा एकूण चार, आरोग्य सहाय्यक (पुरुष) प्रशासकीय पाच तर विनंती सहा अशा एकूण ११, आरोग्य सेवक प्रशासकीय ११ व विनंतीवरून ११ अशा एकूण २२ आणि आरोग्य सेविका प्रशासकीय २७ व विनंती १३ अशा ४० बदल्या झाल्या असून, सोमवारी एकूण ८४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या पारदर्शक पद्धतीने पार पडल्या आहेत.

बदली प्रक्रियेत यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर - घुगे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, महिला व बालकल्‍याण विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रेखा काळम - कदम, जिल्‍हा कृषी अधिकारी तानाजी चिमनशेट्टे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT