Nanded Zilla Parishad  sakal
नांदेड

नांदेड : कुरुळा जिल्हा परिषद गट ठरणार तालुक्यात लक्षवेधी?

स्थानिक उमेदवाराला प्राधान्य; गण बदलाचा होणार परिणाम

विठ्ठल चिवडे

कुरुळा : मागील काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकासंदर्भात गट बदलांच्या चर्चा आणि त्याबाबतची राजकीय गणिते मतदार मांडत होते. निवडणुका लांबल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला होता, परंतु नुकतेच नांदेड जिल्हा परिषद निवडणुकांचे गटनिहाय आरक्षण जाहीर झाले आणि अनेकांचा जीव भांड्यात पडला. यात अनेकांचे कयास चुकले तर अनेकांसाठी ओह. आश्चर्यम् अशी परिस्थिती राहिली. कारण कुरुळा गट हा अनेक इच्छुक उमेदवारासाठी लक्षवेधी ठरला असून आरक्षण सोडत ही खुल्या प्रवर्गासाठी असल्याने तालुक्यातील दिग्गज नेत्यांचे लक्ष आता कुरुळा गटाकडे लागले आहे.

कंधार तालुक्यात एकमेव नवीन जिल्हा परिषद गटाची वाढ झाली असून त्यात कुरुळा गटाची विभागणी झाली आहे. यातून नवीन गौळ गट निर्माण झाल्याने गत निवडणुकातील गावे आता वेगळ्या गटात विभागली आहेत. परिणामतः गावांची झालेली अदलाबदल इच्छुक उमेदवारांसाठी डोकेदुखी तर काहींसाठी फायद्याची ठरणार आहेत. प्रारूप रचनेत कुरुळा गटातील दिग्रस गण पूर्णतः गौळ गटात गेला असून फुलवळ गटातील दैठणा, पोखर्णी, नागलगाव, नेहरूनगर यासह इतर तांड्यांचा समावेश कुरुळा गटात झाला आहे.

कुरुळा जिल्हा परिषद गटावर काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांचा प्रभाव राहिला आहे. कुरुळा गटात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड, शिवसेना व वंचित बहुजन आघाडी यांना मानणारा मतदार असला तरी आगामी जिल्हा परिषदेचा उमेदवार हा आयात नसावा तो स्थानिक असावा अशी सर्वसामान्य मतदारांची भावना आहे. तर दुसरीकडे भाजपकडून मोठा उमेदवार बाहेरून येणार असल्याची चर्चा आहे. याअगोदर नांदेड जिल्ह्यातील एकमेव अपक्ष जिल्हा परिषद अशी कुरुळा गटाची ओळख आहे.

बाळासाहेब गोमारे यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास ठेवून अपक्ष उमेदवार शोभा गोमारे यांना विजयी कौल दिला होता. सद्या सोशल मीडियात राळ उडत असल्याने आत्तापासूनच भावी जिल्हा परिषद सदस्यांचे बॅनर व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. उमेदवार आत्तापासूनच प्रत्येक मतदारांची काळजी घेत असून वयक्तिक संपर्क साधण्याचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT