rain sakal
नांदेड

Nanded : परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान

संध्याकाळी तासभर मुसळधार; सखल भागात पाणीच पाणी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहर आणि परिसराला मंगळवारी (ता. ११) सायंकाळी सहा ते सात या एका तासात मुसळधार पावसाने झोडपले. जोरदार आलेल्या पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले.

यंदाच्या वर्षी शहर आणि जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्तच होते. शंभर टक्क्याहून अधिक पाऊस जिल्ह्यात यंदा झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसानेही पुन्हा मोठे नुकसान होणार आहे. गेल्या आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. मंगळवारी दिवसभर आभाळ भरून आले होते. सायंकाळी सहा वाजता विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. हा पाऊस तब्बल एक तास सुरू होता.

जिल्ह्यात जून महिन्यामध्ये खरिपांच्या पेरण्या झाल्या. त्यानंतर जुलैमध्ये तुफान पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन सखल तसेच नाल्याकाठच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात पाच लाख १८ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधीक पिकांचे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीचा फटका सात लाखांपेक्षा अधीक शेतकऱ्यांना बसला.

यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना सतत संकटाचा सामना करावा लागला. या आपत्तीतून शिल्लक राहिलेले सोयाबीनचे पिक सध्या काढणीला आले असताना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर

कापूस पिकाचेही नुकसान झाले आहे. पावसामुळे कापणी केलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. कापणी केलेले सोयाबीन अनेक ठिकाणी पावसाने भिजले आहे. परिणामी धान्याला मोड फूटून नुकसान होत असल्याने ते पिक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी देखील हतबल झाले आहेत.

रस्त्यावरील पाणी घरात शिरले

शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात रस्त्यावरील पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेकांच्या घरातील साहित्यही भिजले. सध्या शहरातील अनेक भागात सिमेंटचे रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. हे रस्ते उंच झाल्यामुळे आणि पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे अनेक गल्लीबोळात पाणी साचून तळे तयार झाले होते. त्यातून वाहनधारकांनी वाट काढावी लागली. सततच्या पावसामुळे नागरिकही वैतागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT