file photo 
नांदेड

नांदेडकरांनो सावधान - मंगळवारी दिवसभरात ७६ व्यक्ती कोरोनाबाधित तर एकाचा मृत्यू

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोना संसर्गाबाबतीत मंगळवारी (ता. २३) सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार ७६ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. त्याचबरोबर नांदेड शहरात त्यातील ५० जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता सतर्क राहण्याची गरज आहे. दरम्यान, उपचार घेत असलेल्या ३२ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

मंगळवारी आलेल्या एक हजार ३४९ अहवालापैकी एक हजार २६२ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २३ हजार २८४ एवढी झाली असून यातील २२ हजार ६१ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. एकुण ४१८ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १० बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. सोमवारी (ता. २२) किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील ७५ वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ५९४ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

मंगळवारी ३२ जण झाले बरे
मंगळवारी बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी एक, महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण २०, देगलूर कोविड रुग्णालय एक, गोकुंदा कोविड रुग्णालय एक, हदगाव कोविड रुग्णालय एक, खासगी रुग्णालय आठ असे एकूण ३२ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.७४ टक्के आहे.  आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्र १६, भोकर तालुक्यात एक, किनवट तालुक्यात तीन, मुखेड तालुक्यात एक, अर्धापूर एक, कंधार एक, लोहा तालुक्यात तीन असे एकुण २६ बाधित आढळले. ॲन्टीजेन किट्स तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्र ३४, भोकर तालुक्यात दोन, किनवट तालुक्यात सात, मुदखेड तालुक्यात एक, नांदेड ग्रामीण दोन, हदगाव तालुक्यात दोन, लोहा तालुक्यात एक, मुखेड तालुक्यात एक असे एकूण ५० बाधित आढळले.

४१८ बाधितांवर औषधोपचार सुरु 
जिल्ह्यात ४१८ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ३१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ५२, किनवट कोविड रुग्णालयात १९, हदगाव कोविड रुग्णालय पाच, देगलूर कोविड रुग्णालय चार, नांदेड महापालिका अंतर्गत गृहविलगीकरण २२४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ५१, खासगी रुग्णालय ३२ आहेत. मंगळवारी (ता. २३) सायंकाळी पाच वाजता सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १५३, तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ५२ एवढी आहे.  

  • एकुण स्वॅब - २ लाख २३ हजार ८२१ 
  • एकुण निगेटिव्ह - १ लाख ९६ हजार ८९ 
  • एकुण पॉझिटिव्ह - २३ हजार २८४ 
  • एकूण बरे - २२ हजार ६१ 
  • एकुण मृत्यू - ५९४ 
  • मंगळवारी पॉझिटिव्ह - ७६ 
  • मंगळवारी बरे - ३२ 
  • मंगळवारी मृत्यू - एक 
  • आज प्रलंबित स्वॅब - ३९५ 
  • उपचार सुरू - ४१८ 
  • अतिगंभीर - दहा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT