नांदेड

नांदेडकर दक्ष अन् प्रशासन सज्ज

कोरोना रुग्ण वाढले; महापालिकेतर्फे कोविड सेंटरची उभारणी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गेल्या आठवडाभरापासून कोरोना संसर्ग (Corona infection) वाढल्याने रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने पुन्हा यंत्रणा सज्ज झाली आहे. नांदेडकरांनी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले असून महापालिकेच्या वतीने कोविड (covid) सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच ताप, सर्दी, खोकला अशा व्हायरल फिव्हरचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढण्याची तसेच लॉकडाउन सुरू होते की काय? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, महापालिकेचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन आदींच्या प्रमुख उपस्थितीत उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

लसीकरणाचा वेग वाढला

दरम्यान, दुसरीकडे प्रशासनाने लसीकरणाचाही वेग वाढवला आहे. त्याचबरोबर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरणही घेण्यात येत आहे. नांदेड शहरातील शाळा, महाविद्यालयासह कोचिंग क्लासमध्ये तसेच महत्वाच्या ठिकाणी लसीकरण शिबिर घेऊन सुद्धपातळीवर लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी दिली.

'नांदेडला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी घेण्यात येत आहे. तसेच कौठा आणि भक्ती कोविड सेंटर या दोन ठिकाणी पुन्हा कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.'

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, महापालिका.

'वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन लसीकरणावर जास्तीत जास्त भर देण्यात येत आहे. तसेच कोरोना चाचणीचे सेंटरही वाढविण्यात आले आहेत.'

- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel News: पनवेलच्या कळंबोली गेट पंप प्रकल्पावरून नवा वाद, ठाकरे गटाच्या नगरसेविका आक्रमक

IND vs PAK T20 WC: पाकिस्तानला चौथा धक्का; अक्षर पटेलने बाबर आझमला केलं 'क्लिन बोल्ड'

Pune Crime : कल्याणीनगरमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाईल हिसकावला, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात; एक ठार, १७ जण जखमी

Pune Crime : महापालिका भवनजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल लंपास

SCROLL FOR NEXT