नांदेड - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सोमवारी माहिती दिली.  
नांदेड

नांदेडकरांनो...विनाकारण रस्त्यावर फिरून जीव धोक्यात घालू नका - विशेष पोलिस महानिरीक्षक तांबोळी

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्यामुळे आता सावध राहण्याची गरज असून नागरिकांनी देखील आपले आणि आपल्या कुटुंबासह मित्र, नातेवाईकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि विनाकारण रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सोमवारी (ता. १२) केले आहे.
 
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री. तांबोळी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. आरोग्य विभाग, महापालिका तसेच अन्न व औषध विभाग यांच्यासह इतर विभागाच्या मदतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. पोलिस विभागाने देखील विविध चौकात आणि मुख्य रस्ते आणि नाक्यावर बंदोबस्त ठेवला आहे. आता नागरिकांनी देखील आपआपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. तांबोळी यांनी यावेळी केले. 

३२५ पोलिस अधिकारी, कर्मचारी बाधित 
कोरोना संसर्ग वाढत असून परिक्षेत्रातील जवळपास ३२५ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एकीकडे बंदोबस्ताचे काम करत असताना दुसरीकडे पोलिसांना देखील कोरोना संसर्गाचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर काही जण दोनदा कोरोनाबाधित झाले आहेत तर काही जणांवर उपचारही चालू आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील कोरोनाचे संकट आवाक्याबाहेर जाणार नाही, याची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन श्री. तांबोळी यांनी केले. 

प्रशासनाला सहकार्य करा
वाढता कोरोना संसर्ग रोखायचा असेल तर शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. नियमित हात धुवा, मास्क वापरा, सोशल डिस्टिन्सिंग पाळा. त्याचबरोबर कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्यावी. आपला समाज आणि देश कोरोनामुक्त करायचा असेल तर प्रत्येकाने जबाबदारीने आपली आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्या शिवाय कोरोना संसर्ग आटोक्यात येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे. कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केले आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Border Security : पाकिस्तान, बांगलादेश सीमेवर ६ हजार किमीची भींत, शत्रुला रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाहांकडून नव्या प्रकल्पाची घोषणा

Narendra Modi: ''लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप नको'', मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

SRH vs RCB Live: रसिख दारच्या 'यॉर्कर'ने ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला, विराट कोहली कसला पेटला... सेलिब्रेशन एकदा पाहाच Video

IPL 2026 : KKR ला मोठा धक्का! सर्वाधिक धावा करणारा फलंदाज स्पर्धेतून बाहेर; प्ले ऑफच्या शर्यतीत आता तग कसा धरणार?

काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षांची नियुक्ती! पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी; ६९ जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT