पिककर्ज वाटप.jpg 
नांदेड

पीक कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंका शून्य

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी दोन हजार ३१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनान बॅंकांना दिले आहे. असे असताना जिल्ह्यात सर्वाधीक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी अाजपर्यंत कर्जवाटपाला सुरवात केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ जिल्हा बॅंक व ग्रामिण बॅंकने १.३२ टक्क्यानुसार ५०८ सभासदांना दोन कोटी ५६ लाखांचे पिककर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंध कार्यालयाकडून मिळाली.

अडीच हजार कोटी पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य
जिल्हास्तरीय बॅंकर्स कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आगामी खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी दोन हजार ३१ कोटी तर रब्बीसाठी ५०७ कोटी असे एकूण दोन हजार ५३९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २८ बॅंकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे. या बाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना दिली होती. 

कर्जमाफीत अडकले पिककर्ज वाटप
परंतु यंदा शेतकऱ्यांची पिककर्ज माफी कोरोना विषाणूच्या उपाययोजनेत लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये अडकल्याने पिककर्ज वाटपाचे काम ठप्प आहे. पिककर्ज माफीसाठी पात्र ठरलेल्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग झाल्यानंतर त्या खात्याला नव्याने कर्ज वापट करणे सोयीचे होइल, अशा विचारात असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकेने चालू बाकीदार तसेच नव्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्ज वाटल केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जिल्हा बॅंकेकडून कर्ज वाटप
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून जिल्ह्यातील ४७५ शेतकऱ्यांना दोन कोटी २२ लाख तर महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेने ३३ शेतकऱ्यांना ३४ लाखांचे कर्ज वाटल केले आहे. या दोन बॅंकांच्या शाखाकडून आजपर्यंत १.३२ टक्क्यानुसार ५०८ सभासदांना दोन कोटी ५६ लाखांचे पिककर्ज वाटप केले आहे. परंतु जिल्ह्यात सर्वाधीक शाखा असलेल्या राष्ट्रीकृत बॅंकांच्या शाखांनी आजपर्यंत कर्जवाटपाचे खातेही उघडले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत
जून महिना जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे तसेच खते खरेदी करण्यासाठी पैशाची आवश्‍यकता असते. अशावेळी कर्जमाफी तसेच कर्ज वाटपाचे काम रखडल्यास कोरोनामुळे शेतीमाल घरा पडून असलेल्या शेतकऱ्यांना एन पेरणीच्या हंगामात अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे. शासनाने पिककर्ज मुक्तीचे काम लवकर पूर्ण करुन लगेच पिककर्ज वाटप करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

अडीच कोटींचे कर्ज वाटप
जिल्ह्यात आजपर्यंत जिल्हा सहकारी बॅंक व ग्रामिण बॅंकेकडून ५०८ शेतकऱ्यांना दोन कोटी ५६ लाखांचे पिककर्ज वाटप झाले आहे. इतर बॅंकांकडूनही सध्या पात्र खातेदारांना पिककर्ज वाटपाचे काम सुरु होइल. 
- प्रविण फडणीस
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT