New between Bidar Nanded Railway line approved sakal
नांदेड

बिदर-नांदेडदरम्यान नवीन रेल्वेलाईन मंजूर

खासदार चिखलीकर; रेल्वे मार्ग भाविकांना दिलासा देणारा

सकाळ ऑनलाईन टीम

नांदेड : नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात नांदेड - बिदर या नवीन रेल्वे लाईनला मंजुरी मिळाली आहे. हा रेल्वेमार्ग काही वर्षात सुरु होणार असून तो दिलासादायक ठरणार असल्याची माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

नांदेड - बिदर रेल्वेचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी अनेक वर्षांपासून लढा आणि प्रयत्न सुरू होते. मात्र, राज्यात आणि केंद्रात अनेकवेळा सत्तेत असलेल्या काँग्रेसला या मार्गावर रेल्वेलाईन आणण्यासाठी यश मिळाले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या माध्यमातून या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळवून घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष काम आणि अर्थसंकल्पात तरतूद व्हावी, यासाठी पाठपुरावा केला. संसदेच्या अधिवेशनातही प्रश्न उपस्थित केले होते. शीख बांधवांसाठी आणि अन्य दळणवळणाच्या वाहतुकीसाठी हा मार्ग महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच मुदखेड - परभणी विद्युतीकरण व दुहेरीकरणालाही मंजुरी देण्यात आल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले.

रेल्वे अर्थसंकल्पाच्या पिंक बुकमध्ये बिदर - नांदेड या १५५ किलोमीटर अंतराच्या नवीन रेल्वे लाईनला मंजुरी देण्यात आली असून यासाठी सुमारे दोन हजार २५२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली. मुदखेड - परभणी (८१.४३ किलोमीटर) दरम्यानच्या दुहेरी लाईनसाठी ३० कोटी २० लाख रुपये अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले. नांदेड मंडळ अंतर्गत चौकीदार नसलेल्या फाटकांवर चौकीदार नियुक्तीसाठी शंभर कोटी रुपये मंजूर झाले. या शिवाय नादेड डिव्हीजनतंर्गत सब - वे चे रेल्वे क्रॉसिंग, भोकर - हदगाव, परभणी - पिंगळी रोड, गंगाखेड - पोखर्णी, चोंडी-वसमत, हिंगोली - धामनी रोड दरम्यान उंच रस्ते पूल बांधण्यास मान्यता देण्यात आली.

याशिवाय मुदखेड - आदिलाबाद - पिपळखुटी, विकाराबाद परथ या दरम्यान लातूर - तिरुपती, नांदेड - पंढरपूर रेल्वेचा प्रस्ताव मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. रिनिव्हललाही मान्यता देण्यात आली. तसेच मनमाड - मुदखेड दरम्यान आठ पुलांचे पुनर्निर्माण केले जाणार आहे.

''मनमाड - परभणी - नांदेड - सिकंदराबाद - गुढगल - घोड - गुंटकल या दरम्यान सिग्नल आणि दूरसंचार संबंधिताच्या कार्यालयातही अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. नांदेडला श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या समाधीचे दर्शन घेवून शीख भाविक बिदरलाही जातात. त्यामुळे नांदेड - बिदर हा रेल्वे मार्ग मंजूर करावा, या मागणीची दखल घेवून रेल्वे अर्थसंकल्पात एक हजार २५१ कोटी रुपये खर्चाच्या नांदेड - बीदर मार्गाला मंजूरी देण्यात आली आहे.''

- प्रताप पाटील चिखलीकर, खासदार, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM KISAN 22nd Installment : महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, एका चुकीमुळे थांबला २००० रुपयांचा हप्ता; नेमकं काय घडलं ?

Leopard inside ZP School : बछड्यांना घेऊन बिबट्या आला शाळेच्या आवारात.., मुलं झाली भयभीत, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Mumbai: “तू खालच्या जातीचा…”; ब्रेकअपनंतर टोमणे; मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन, प्रेयसीवर SC-ST कायद्यांतर्गत गुन्हा

चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपने मारहाण, अपमान जिव्हारी; १९ वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

Tom Bruce: सहसदस्य देश केवळ विश्वकरंडकापुरतेच मर्यादित; स्कॉटलंडच्या टॉम ब्रुसची खंत!

SCROLL FOR NEXT