nnd22sgp12.jpg 
नांदेड

‘स्वारातीम’ विद्यापीठासमोर नवा पेच!

श्याम जाधव


नवीन नांदेड ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी सातवा वेतन आयोग, सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीतर्फे गुरुवारपासून (ता. २४) पुकारलेल्या राज्यव्यापी लेखणी-अवजार बंदसह ठिय्या आंदोलन करणार आहेत.


शिक्षकेतर कर्मचारी सहभागी 
राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. पण राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही. यामुळे महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. यापूर्वी अनेक निवेदनाद्वारे, आंदोलनाद्वारे वेळोवेळी प्रशासनाच्या व शासनाच्या निर्देशनास सदर बाब आणून दिली आहे, तरीही शासनदरबारी याबाबत उदासीनता दिसून येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी कृती समितीच्या वतीने १८ सप्टेंबरपासून सुरू केलेल्या काळ्याफिती लावून कामकाज आंदोलनामध्ये विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. हेच कर्मचारी आता अवजार बंदसह ठिय्या आंदोलन करणार आहेत. 


पाच दिवसांचा आठवडा 
सातवा वेतन आयोगाशिवाय सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे, पाच दिवसांचा आठवडा लागू करणे आणि इतर प्रमुख प्रलंबित मागण्यांसह अजूनही काही मागण्यांचा उल्लेख या कृती समितीच्या मागण्यांमध्ये आहे. या मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्याकडे देण्यात आले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कृती समितीचे अध्यक्ष काळबा हनवते, सचिव तथा उपकुलसचिव हुशारसिंग साबळे, अधिकारी फोरमचे अध्यक्ष डॉ.अशोक कदम, अधिसभा सदस्य उद्धव हंबर्डे, माजी अधिसभा सदस्य शिवराम लुटे, गोविंद हंबर्डे, शिवाजी चांदणे, संदीप एडके, तुकाराम हंबर्डे, प्रमोद देशमुख यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

परीक्षा लांबणीवर पडणार काय? 
थोड्याच दिवसात विद्यापीठाच्या परीक्षा येत आहेत आणि त्यातच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे परीक्षा लांबणीवर पडतात की काय? असा सूर विद्यार्थी वर्गातून निघत असून, विद्यापीठासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. 

संपादन - स्‍वप्निल गायकवाड
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT