तामसा अॅप 
नांदेड

तामसाच्या तरुण उद्योजकाचे पुढचे पाऊल :‘श्रमिको ॲप’कार्यान्वीत; स्किल लेबरसोबतच संपर्क शक्य

कोरोना संकटामुळे जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला असून याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या श्रमजीवी कामगारांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.

शशिकांत धानोरकर

तामसा ( जिल्हा नांदेड ) : तामसा (ता. हदगाव) (Tamsa hadgaon) येथील भूमिपुत्र व सध्या पनवेल येथे उद्योजक म्हणून कार्यरत असलेले विकास औटे यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कामगारासाठी उद्भवलेल्या परिस्थितीवर उपयुक्त ठरणारे ‘श्रमिको ॲप’चे (Shrimiko aap) उद्‍घाटन महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने राज्याचे कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते झाले आहे. Next step of Tamasa's young entrepreneur: launching 'Shramiko App'; Only contact with Skill Labor

कोरोना संकटामुळे जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला असून याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या श्रमजीवी कामगारांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. कामगारांचे जीवनमान या महामारीच्या संकटामुळे बदलले असून गावी किंवा स्वतःच्या प्रांतात परतलेल्या कामगारांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. दोन वर्षापूर्वी स्वतःच्या छोट्या बहिणीच्या उपचारादरम्यान पनवेल येथे विकास यांनी परिसरातील कामगारांचे जीवन जगणे जवळून अनुभवले व त्याचा परिणाम त्यांच्या विचारसरणी बदलांमध्ये झाला. कोरोनामुळे लाखो कामगार स्थलांतरित झाले. उद्योगक्षेत्र किंवा कारखानदारीमध्ये कामगारांची भूमिका महत्त्वाची असून स्थलांतरित होण्यामुळे समस्याग्रस्त असणाऱ्या कामगारांना ‘श्रमिको ॲप’च्या माध्यमातून रोजगाराबाबत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा - शासकिय पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटनेची प्रदेश कार्यकारीणीची निवड

या ॲपमध्ये कामगार आपली माहिती स्मार्टफोनमध्ये भरू शकतात किंवा साध्या फोनवर हेल्पलाईनद्वारे सांगू शकतात. ज्यामुळे कामगारांची उपलब्धता होण्यासाठी उद्योजक किंवा कारखानदारांना हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. कामगारांचे कौशल्यविकास करणे व सामाजिक हित जोपासण्यासाठी ॲपची निर्मिती झाली आहे. उद्योजकांना कोवीडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर कामगारांची कमतरता भासणार असून या ॲपच्या माध्यमातून स्किललेबर सोबत संपर्क करणे सहज शक्य होणार आहे.

केंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडिया या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाशी निगडित श्रमिको ॲप आहे. कोविडमुळे समाज जीवनात उद्भवलेल्या नकारात्मक परिस्थितीमध्ये होरपळणाऱ्या कामगारांच्या बाबतीत सकारात्मक वातावरण वाढविण्यासाठी या ॲपचा चांगला उपयोग होऊ शकते. ॲपच्या माध्यमातून कामगारांना एका फोन कॉलवर मदत मिळणार आहे. या ॲपमध्ये कामगारांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती असून योजनांचा लाभ घेण्यासाठीच्या पद्धत सांगितल्या आहे.

‘श्रमिको ॲप’ हे श्रम करणाऱ्या लोकांची इकोसिस्टीम आहे. कोवीडच्या संकटात संधी शोधण्याचा हा प्रयत्न आहे. समाजातील कामगारांच्या समस्या ओळखून त्यावर समाधान देणे आवश्यक आहे. श्रमजीवी, वंचित, उपेक्षित कामगारांबाबत वडिलांची प्रेरणा श्रमिकोॲप निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरली आहे.

- विकास औटे, उद्योजक, तामसा, नांदेड.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT