file photo 
नांदेड

नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू 

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नांदेड वाघाळा महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात ता. २२ डिसेंबरपासून ते ता. पाच जानेवारीपर्यंत रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यत रात्रीची संचारबंदी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ नुसार एका आदेशाद्वारे लागू केली आहे. 

फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (एक) (तीन) अन्वये जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश ता. ३१ ऑक्टोंबर व ता. चार, ता. १५ व ता. २८ नोव्हेंबर २०२० मधील अटी व शर्ती जशास तसे लागू राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करणारे सर्व अधिकारी यांनी आदेशातील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई  करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतून केलेल्या कृत्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचेविरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद केले आहे.

सातवा वेतन आयोग नांदेड महापालिकेत लागू 
नांदेड वाघाळा महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी ता. एक जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास तसेच प्रत्यक्ष वेतन ता. एक डिसेंबर २०२० पासून देण्यास बुधवारी (ता. २३) च्या पत्रानुसार राज्य शासनाने मान्यता दिली आहे. महापालिकेच्या उपायुक्त यांनी याबाबतची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. 

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानले आभार
राज्यातील महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या तरतुदी लागू करण्याबाबतच्या कार्यपद्धतीचा निर्णय शासनाने ता. दोन आॅगस्ट २०१९ च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. त्यानुसार ता. २९ आॅगस्ट २०१९ च्या शासन निर्णयान्वये याबाबतचे प्रस्ताव शासनास सादर करण्याची कार्यपद्धती विहीत करण्यात आली होती. त्याअनुषंगाने नांदेड वाघाळा महापालिकेने याबाबतचा प्रस्ताव ता. १५ नोव्हेंबर २०१९ च्या पत्रान्वये शासनास सादर केला होता. त्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत महापौर मोहिनी येवनकर आणि आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. नवीन वर्षात सातवा वेतन स्वरुपात भेट दिल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राज्य शासनासह महापौर, आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT