School sakal
नांदेड

नांदेड : नववी ते बारावीच्या शाळा होणार सुरू

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : विद्यार्थ्यांचे लसीकरण आवश्यक

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शासनाने पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, हे निर्देश देताना स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्याचे सांगितले. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील फक्त नववी ते बारावीच्या शाळा सोमवारपासून (ता. २४) सुरु करण्याचे आदेश शुक्रवारी (ता. २१) काढले आहेत.

कोरोना संसर्गामुळे दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने दिवाळीनंतर शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. परंतु, पुन्हा कोरोनाने उसळी मारल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शिक्षक संघटना, राजकीय व सामाजिक संघटना तसेच पालकांमधूनही शाळा सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली. त्यामुळे शासनाने गुरुवारी (ता.२०) राज्यातील सर्व माध्यमाच्या पहिली ते बारावीच्या शाळा स्थानिक परिस्थिती बघून जिल्हा प्रशासनाने सुरु कराव्यात, असे निर्देश दिले आहेत.

नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणीक वाढत आहे. शिवाय लसीकरणही धिम्या गतीने सुरु असल्याने जिल्ह्यातील शाळा सुरु होतील की नाही, अशी शंका पालकांमध्ये होती. जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. संबंधित शाळांनी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, १५ ते १८ वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचेही शंभर टक्के लसीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

SCROLL FOR NEXT