file photo 
नांदेड

नांदेड शहरात रहदारीच्या ठिकाणी होणार ‘नो बॅनर झोन’ 

अभय कुळकजाईकर

नांदेड - शहरात रहदारी तसेच वाहतूक जास्त असलेल्या ठिकाणी व चौकांमध्ये अनाधिकृत जाहिरात फलक, बॅनर, होल्डिंग्ज लावणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने खासगी जागेवरील जाहिरात फलक वगळून सात जागा ‘नो बॅनर झोन’ म्हणून जाहीर केल्या आहेत. तसेच याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर सादर केला आहे. 

महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनाधिकृत जाहिरात, घोषणा फलक, होल्डिंग्ज, पोस्टर्स या संदर्भात संबंधित विभागाची नुकतीच बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. 

मोठ्या प्रमाणावर जाहिरात फलक
नांदेड महापालिका हद्दीमध्ये रहदारी, वाहतूक जास्त असलेल्या ठिकाणी किंवा चौकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फूटपाथ, सिग्नलच्या पोलवर, सीसीटीव्ही कॅमेरा पोलवर आदी ठिकाणी मोठ्या आकाराचे विनापरवानगी जाहिरात फलक लावण्यात येत आहेत. त्यामुळे वाद निर्माण होत आहेत. त्याचबरोबर वाहतुकीस तसेच पायी चालणाऱ्यास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊन शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे हे थांबविणे गरजेचे होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका हद्दीमध्ये विनापरवानगी जाहिरात फलक लाऊ नयेत. मात्र, तरी देखील काही जण विनापरवानगी जाहिरात फलक लावत असल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे असे फलक २४ तासाच्या आत काढून घ्यावेत, अन्यथा फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. लहाने यांनी दिला आहे. 

न्यायालयाच्या आदेशाचे करा पालन
त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडूनही बऱ्याच ठिकाणी वाढदिवसाचे, अभिनंदनाचे किंवा आंदोलनाचे व इतर प्रकारचे जाहिरात फलक अनाधिकृतपणे व विनापरवानगी लावण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधितांनी आपआपल्या कार्यकर्त्यांना सूचना देऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. 

सर्वसाधारण सभेला प्रस्ताव सादर 
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच अनाधिकृत जाहिरात फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव दाखल केला आहे. त्यात राज कॉर्नर (तरोडेकर चौक), वर्कशॉफ कॉर्नर, आयटीआय कॉर्नर (महात्मा फुले पुतळा), शिवाजीनगर, वजिराबाद (मुथा चौक), देगलूर नाका आणि आण्णा भाऊ साठे चौक आदी ठिकाणी खासगी जागेवरील जाहिरात फलक वगळून ‘नो बॅनर झोन’ घोषित करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT