st bus Sakal
नांदेड

दोन महिन्यांत नांदेड विभागातून एकही बस धावली नाही; कारवाईला सुरुवात

एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठीचा संप आज ना उद्या मिटेल, असे प्रवाशांना वाटत होते. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल फारसे काही वाटेनासे झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठीचा संप आज ना उद्या मिटेल, असे प्रवाशांना वाटत होते. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल फारसे काही वाटेनासे झाले आहे.

नांदेड - एसटी कर्मचाऱ्यांचा (St Employee) विविध मागण्यांसाठीचा संप (Strike) आज ना उद्या मिटेल, असे प्रवाशांना (Passenger) वाटत होते. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल फारसे काही वाटेनासे झाले आहे. त्यामुळे दोन महिने उलटले तरी नांदेड विभागातून एकही एसटी बस धावली नाही. दरम्यान, महामंडळाच्या वतीने कारवाई (crime) करण्यात सुरूवात झाली असून कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटीसा देण्यात येत आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी दोन महिन्यापासून आंदोलन करत आहेत. असे असले तरी, काही जिल्ह्यातील एसटी कर्मचारी कामावर परतल्याने पोलीस बंदोबस्तात प्रवासी घेऊन बस धावत आहेत. त्यामुळे संपात फुट पडली आहे. नांदेड विभागात मात्र आत्तापर्यंत एकही चालक, वाहक कर्मचारी कामावर हजर झालेला नाही. त्यामुळे विभागातून एकही प्रवासी बस बाहेर पडलेली नाही.

अनेक वेळा विनवनी करुन देखील कामावर हजर न झालेल्या ५२ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुरु करण्यात आली आहे. यात नांदेड आगारातील चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुढील दोन ते तीन दिवसात त्यांच्याकडुन समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

पाच जानेवारीची प्रतीक्षा

आत्तापर्यंत एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उपोषण न करता कामावर हजर झाले पाहिजे. अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला सावरण्यासाठी पुढे आले पाहिजे, अशी अनेकांची भावना आहे. परंतु त्यासाठी कर्मचाऱ्यांनी ता. पाच जानेवारीपर्यंत कुठलाही निर्णय न घेण्याचा निश्चय केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT