file photo 
नांदेड

महापालिकेच्या दोन अभियंत्यांना नोटीसा- हिंगोली गेट उड्डाणपुलाखाली पाणी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : दोन दिवसापूर्वी शहारात झालेल्या जोरदार पावसाने महापालिकेचे पितळ उघडे पाडले. शहराच्या अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले. अनेक वस्तीमदील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. एवढेच नाही तर नांदेड दक्षिण व उत्तरला जोडणारा हिंगोली गेट उड्डाण पुलाखाली पाणी साचल्याने वाहतुक खोळंबली. साचलेल्या या पाण्यात चक्क एक चारचाकी वाहन तरंगत होते. पाण्याचा निचरा का करण्यात आला नाही यामुळे महापालिका आयुक्त डाॅ. सुनिल लहाने यांनी महापालिकेच्या दोन अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. 

शहराच्या सखल भागात पाणी साचल्याने आयुक्तांनी अधिकार्‍यांना घेतले फैलावर. कारणे दाखवा नोटिसा अनेकांना धक्का दिला. या वर्षी पावसाळ्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. बुधवारी नांदेड तालुक्यातील सर्वात मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. शहरातील हिंगोली गेट येथे पाणी साचले होते. या पाण्यात एक चार चाकी वाहन अडकले होते. सुदैवाने यातील सर्वजण बचावले. या गंभीर   प्रकाराची दखल घेत महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी महापालिकेच्या अभियंत्यांची बैठक घेऊन सर्वांची झाडाझडती घेतली. दरम्यान   कामात कसूर करणाऱ्या दिलीप आरसुडे आणि साहेबराव जाधव या दोन अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  

आमदार बालाजी कल्याणकर यांना रस्त्यावर उतरावे लागले

महापालिका मान्सूनपूर्व तयारी करते. या काळात सखल भागात पाणी थांबणार नाही. यासाठी उपाययोजना केल्या जातात असे असतानाही कॅनॉल रोड येथे पाणी साचल्याने आमदार बालाजी कल्याणकर यांना रस्त्यावर उतरावे लागले. दरम्यान बुधवारी झालेल्या पावसामुळे शहरातील हिंगोली उड्डाणपुलाखाली पाणी साचले होते. अडकलेल्या वाहनातील सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान येथील पाण्याचा निचरा करणारे डिझेल पंप बंद असल्याने येथील पाण्याचा निचरा करता आला नाही. यामुळे महापालिका आयुक्त डॉक्टर लहाने यांनी संबंधित अभियंत्यास याबाबत तात्काळ खुलासा करावा अन्यथा कारवाईस सामोरे जावे असा पवित्रा घेतला. शहरांमध्ये कोरोना महामारीचा विळखा वाढत आहे. शहरातील आनंदनगर, वसंतनगर, बाबानगर, कॅनल रोड, शाहूनगर, बाफना रोड, नविन कौठा भागात पाणी साचले होते. यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT