gokunda.jpg
gokunda.jpg 
नांदेड

ऑनलाइन धम्म कविसंमेलनात गर्जली बुद्धवाणी

सकाळ वृत्तसेवा


गोकुंदा, (ता.किनवट, जि. नांदेड) ः ‘बुद्ध घरात बुद्ध दारात, बुद्ध मेंदूत बुद्ध हृदयात, युद्धा आधी बुद्ध, युद्धानंतर बुद्ध, अशोकाआधी बुद्ध, अशोकानंतरही बुद्ध, बाबासाहेबांआधी बुद्ध, बाबासाहेबांनंतरही बुद्ध, फक्त बाबासाहेबांनी दाखविलेला बुद्धच एक जीवन मार्ग.’ कविसंमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. अंबादास कांबळे यांच्या कवितेने धम्म कविसंमेलनात सुरवात झाली. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक सम्बुद्ध यांची जयंती क्रांतिसूर्य व्हॉट्सअॅप समूहात ऑनलाइन साजरी करण्यात आली. प्रारंभी बोधीपूजा व उपस्थित मान्यवरांचे स्वागत क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे उत्तम कांनिदे व रमेश मुनेश्वर यांनी केले. महेंद्र नरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. राजा तामगाडगे यांनी आभार मानले. यवतमाळ येथील गझलकार रमेश बुरबुरे यांनी जबरदस्त रचना सादर केली..

‘काळोखाला दूर सारते बुद्ध पौर्णिमा
चांदोबाला जवळ आणते बुद्ध पौर्णिमा
माझी आई मला भासते जनू सुजाता
तिच्या हातची खिर चाखते बुद्ध पौर्णिमा’
यानंतर अमरावतीचे प्रा. सुभाष गडलिंग यांनी 'सिद्धार्थ' रचना सादर केली.


‘प्रत्येक हृदयात असतो
एक सत्यान्वेषी,
जो दुःखाची दवा शोधू पाहतो..
जन्म जरा मृत्यूचे,
नवे अर्थ लावू पाहतो..’
नांदेड येथील चंद्रकात कदम यांनी गझल सादर करून वाहवा मिळविली..


‘आयुष्य प्रत्येकास जर समृद्ध पाहिजे,
हृदयात साऱ्यांच्याच गौतम बुद्ध पाहिजे...
आपापल्या हृदयातला सिद्धार्थ ओळखू
देशात करुणेच्या कुणाला युद्ध पाहिजे...’
घाटंजी येथील कवी प्रितम देवतळे यांनी बाबासाहेबावर रचना सादर केली.


‘हीन दीनाच्या दुःखासाठी
झिजला तू भीमराया..
आई होऊन तू बहुजनांना
लाविलास माया..’
गीतकार सुरेश शेंडे, किनवट यांनी गेय कविता सादर करून वाहवा मिळविली.


‘होता रूढीचा अंधार दाट
तुला दिधली नवी पहाट
निळी निळी ही आकाश धरणी रं तू लीन हो बुद्धाच्या चरणी..’
लॉकडाउनच्या काळात घर घर बुद्ध जयंती साजरी करूया या उपक्रमांतर्गत क्रांतिसूर्य परिवाराने ‘बुद्ध महोत्सव’ आयोजित केला होता. तीन सत्रांत घेतलेल्या या बुद्ध महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. धम्म कविसंमेलनात सहभागी कवींनी उत्तमोत्तम रचना सादर करून बुद्ध विचारांचा जागर केला.


कार्यक्रमास नायब तहासीलदार सर्वेश मेश्राम, अशोक निमसरकर, रूपेश मुनेश्वर, प्रा. डॉ. उत्तम शेंडे, माधव सरपे, शाहीर चंद्रकांत धोटे, अभि. सचिन गिमेकर, प्रा. सुबोध सरपे, राजू कांबळे, शेषराव पाटील, भारध्वाज सर्पे, विजय भगत, अनिल गिमेकर, जयपाल भालेराव, अनिल भवरे, धनराज हलवले, सोमा पाटील, दिलीप कावळे, राजकुमार खरतडे, दिलीप भगत, मोहन भवरे, अजय पाटील, प्रमोद तामगाडगे, अनिल उमरे, सुजाता पोपलवार, सत्यभामा भगत, कुसुम भवरे, सविना मुनेश्‍वर, करुणा पवार, प्रीती भवरे यांच्यासह समूहातील सर्व सभासद ऑनलाइन उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT