इच्छुक उमेदवार  sakal media
नांदेड

नांदेड : आमचा तर मांडव वाळला! ओबीसी इच्छुक उमेदवारांच्या भावना

ओबीसींच्या आरक्षणाला स्थगितीमुळे भावी नगरसेवकांच्या आशेवर पाणी

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : गेल्या काही काळापासून ओबीसी प्रवर्गातील राजकीय आरक्षणाबाबतीत आंदोलन, मोर्चे, आरोप, प्रत्यारोप होत असतांनाच २७ टक्के आरक्षणाबाबतीत स्थगिती आदेशमुळे ओबीसींच्या लोकप्रतिनिधीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या ओबीसींच्या उमेदवारांच्या आशेवर पाणी फिरले आहे, तर आमचा तर मांडव वाळला आहे, अशा भावना ओबीसींच्या उमेदवारांनी व्यक्त केल्या आहेत. जो पर्यंत ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत निवडणुका घेवू नयेत अशी मागणी ओबीसी संघर्ष समितीने केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत २७ टक्के ओबीसी प्रवर्गाला आरक्षणाला स्थगितीमुळे राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही काळापासून तापत आहे. राज्य शासनाने अध्यादेश काढून पन्नास टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या अध्यादेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या स्थगिती आदेशामुळे ओबीसींच्या आरक्षणातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची तयारी पाण्यात गेली आहे.

नगरपंचायतीच्या १७ वार्डचे पहिल्यांदा आरक्षण जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा आरक्षण काढण्यात आले. फेर आरक्षण जाहीर झाल्यानंतर चार जागेसाठी ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या प्रभागातील उमेदवारांनी निवडणूक तयारी सुरू केली, मतदारांच्या भेटी घेतल्या, प्रचार सुरू केला पण उमेदवारी अर्ज दाखल एक दिवस शिल्लक असताना स्थगिती आदेशमुळे ओबीसींच्या उमेदवारांच्या आशेवर पाणी फिरले आहे. प्रचार वाया गेला आहे. स्थगिती आदेशानुसार शहरातील वार्ड क्रमांक एक, सात, नऊ सोळा या वार्डाची निवडणूक स्थगित होऊ शकते.

"आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मतदारांच्या भेटी घेतल्या होत्या; पण शेवटच्या क्षणी स्थगिती आदेश आला. एखाद्या घरी विवाहाची तयारी पूर्ण व्हावी, पण ऐन वेळी लग्न रद्द व्हावे मांडव वाळून जावा अशी परिस्थिती आमची झाली आहे."

- व्यंकटी राऊत

"राज्यात ओबीसी प्रवर्ग हा महत्त्वाचा घटक आहे. या घटकाला डावलून आरक्षण न‌ देता निवडणूक घेणे म्हणजे या घटकांवर खुप मोठा अन्याय करण्यासारखे आहे. ‌‌‌‌‌‌‌‌जो पर्यंत ओबीसींच्या आरक्षणाबाबतीत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूका घेवू नये. तसेच २७ टक्के आरक्षण कायम ठेवण्यात यावे."

- छत्रपती कानोडे, अध्यक्ष,ओबीसी संघर्ष समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D-Mart ची ऑफर खरी वाटली, पण अभिनेत्याला कळलंच नाही अन् खातं रिकामं झालं, वाचा नाहीतर तुमचा खिसाही होईल रिकामा

CM Yogi Adityanath: गोरखपूरला नव्या ओव्हरब्रिजची भेट! १३७.८३ कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण; सीएम योगींचा विरोधकांवर घणाघात

Kolhapur Crime News : हुपरीत मुलानेच आई-वडिलांचा खून करण्याचं खर कारण आलं समोर, पहाटे पाणी भरत असलेल्या निरागस आईच्या गळ्यावर काच मारली अन्

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात आणखी तिघांची किडनी काढली

Parbhani News: शेती गमावण्याचा धक्का! दारू पाजून फसवणूक केल्याच्या तणावातून शेतकऱ्याने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT